News

यंदा राज्यात ऊसाचे उत्पादन अधिक झाले आहे. मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे.

Updated on 17 May, 2022 5:54 PM IST

सध्या राज्यात ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंगाम संपत आला तरी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचे करायचे तरी काय असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पडला. शिवाय उसाचा प्रश्न मार्गी नाही लागला तर मोठ्या आर्थिक समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.

दरम्यान शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरूच राहतील, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टनप्रमाणे 'अतिरिक्त ऊस गाळप' अनुदान देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. यंदा राज्यात ऊसाचे उत्पादन अधिक झाले आहे. मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे.

तसेच अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप हा शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

ठाकरे सरकारची मोठी घोषणा..! आता प्रत्येक कुटुंबात शेळ्यांचे वाटप

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती होती. सुमारे 100 कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार आहे. त्यामुळे राज्यात 1 मे 2022 नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे 52 लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आतापर्यंत जवळजवळ 32 लाख टन गाळप झाले आहे.

तसेच 1 मे 2022 नंतर गाळप होणाऱ्या व 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या उसाला प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येणार आहे. गाळप हंगाम 2021-22 मध्ये राज्यात एकूण 13.67 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असून 2020-21- मध्ये 11.42 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते.

मागील हंगामाची तुलना केल्यास 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. 16 मे 2022 च्या अखेरपर्यंत 100 सहकारी आणि 99 खासगी असे 199 साखर कारखान्यांकडून 1300.62 लाख टन ऊस गाळप झालेले आहेत. यातून असे दिसते की, मागील वर्षापेक्षा सुमारे 55, 920 टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे.

मागील वर्षी या वेळेस 1013.31 लाख टन गाळप झालेले होते. आणि चालू वर्षी 287.31 लाख टन गाळप जास्त झालेले आहेत. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण हे जास्त आहे. याबाबत बैठकीतदेखील चर्चा करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेती करावी तर अशी; पठ्याने घेतले दीड एकरात 10 क्विंटल तीळाचे उत्पादन
आता उजनीचे पाणी होणार लाल? पाणी वाटपावरून मोठा राडा

English Summary: Now the CM is in the fray for extra sugarcane, a big decision taken; Consolation to the farmers
Published on: 17 May 2022, 05:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)