जमिनीच्या किमती काही वर्षांपासून गगनाला भिडले आहेत.म्हणूनच त्या अनुषंगाने जमीनचेतुकडे करून खरेदी-विक्रीचे व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी दोन तीन गुंठे जमीनीची देखील खरेदी विक्री केली जात आहे. जर महसूल अधिनियमाचा विचार केला तर तुकडे बंदी लागू आहे.
असे असताना अशा प्रकारचे व्यवहार सर्रासपणे चालू होते तसेच त्यांची दस्त नोंदणी होत होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते.त्यानुसार या विभागाने एक आदेश जारी केला आहे. या सगळ्या आदेशा विषयीची माहिती या लेखात घेऊ.
जमिनीच्या खरेदी विक्री संबंधातील नवीन नियम
- जर तुम्ही एखादा गटनंबर मधील दोन एकर क्षेत्र आहे आणि त्यातून जर एक किंवा तीन गुंठ्यांत जागा विकत घेणार असेल तर त्याची दस्तनोंदणी आता होणार नाही. याचा अर्थ तुम्ही ती जमीन विकत घेतली तरी सुद्धा ती तुमच्या नावावर होणार नाही.परंतु यामध्ये त्या सर्वे नंबरचालेआऊट करून त्यामध्ये एक किंवा दोन गुंठ्याचे तुकडे पाडून त्यात जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशामान्य लेआउट मधील 1 ते दोन गुंठे जमिनीची व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकेल.
- या आदेश पूर्वी एखाद्या पक्षकारांनी जमिनीची प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा खरेदी किंवा विक्री केली असेल तर अशा व्यवहारांसाठी सुद्धा जिल्हाधिकारी किंवा तत्सम सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.
- शेतजमीन मधील एखादा वेगळा किंवा स्वतंत्र जमिनीचा तुकडा असेल आणि त्याला जर शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित करून किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीची मोजणी नकाशा देण्यात आला असेल, तर अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. परंतु त्या तुकड्यांमध्ये जर भाग पाडणार असाल तर मात्र त्याला अटी व शर्ती लागू राहतील.
जमिनीच्या प्रकारानुसार ठरवण्यात आलेली प्रमाणभूत क्षेत्रे
- शेतजमीन जर कोरडवाहू असेल तर या जमिनीचे प्रमाणभूत15 गुंठे ठरविण्यात आले आहे
- एखाद्या जमीन जर विहीर द्वारे सिंचित होत असेल तर अशा बागायतीचे प्रमाण भूतक्षेत्र वीस गुंठे आहे. कॅनॉल च्या साह्याने जलसिंचन सुविधा असलेल्या बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र दहा गुंठे निश्चित करण्यात आले आहे.( संदर्भ- किसानवाणी)
Share your comments