सेंद्रीय शेतीची कास धरू आरोग्याची हानी टाळू आणि ह्या अनमोल जीवनाचे काही क्षण वाढवू. चला तर आधुनिक शेतीकडे वाटचाल आताच्या शेतकऱ्यांनी करायला हवी.आपले आजोबा पंजोबा सेंद्रीय शेती करत होते त्या पद्धतीने हल्लीचे शेतकरी बंधू नवीन नवीन टेक्नॉलॉजी व ट्रॅक्टरद्वारे शेती करत चालले आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीवर खर्च करत आहे
आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करायला हवी मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते व रासायनिक खतांचा वापर कमी करावा व तसेच तन नाशक कीटकनाशक असे वेगवेगळ्या कंपनीचे फर्टीलायझर मोठ्या प्रमाणावर हल्लीचा शेतकरी वापर करत आहे आणि शेती नापीक करत आहे या रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीचे किती दुष्परिणाम दिसून येत आहे हे तर पंजाब हरियाणा येथील शेतकरी सांगू शकतात कारण पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आपल्या अगोदर मोठ्या प्रमाणे रासायनिक खतांचा वापर त्यांच्या शेती मध्ये केलेला आहे.
हेही वाचा : माझं मत - 'शेवटी आपण पाहुणेच आहोत'
त्यांची संपूर्ण जमीन आता नापिक झालेली आहे म्हणून रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीची वाटचाल करावी सेंद्रिय शेती शेतकऱ्यांनी केली तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदाच आहे कारण शेतीला लागणारे खत व कीटकनाशक तन नाशक हे सर्व शेतकरी आपल्या घरी तयार करू शकतो जसे की शेणखत गांडूळ खत व पिकावर मावा तुडतुडे यांचा अटॅक झाला असता त्यावर लागणारे औषधे म्हणजेच दशपर्णी अर्क निंबोळी अर्क व जीवामृत असे अनेक औषधी व खते शेतकरी स्वतःच्या घरी बनवू शकतो की कंपोस्ट खत.
याने शेतकरी शेतीला लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो व आपल्याला कोणत्याही सावकाराकडून व बँक कडून कर्ज काढायचे काम पडणार नाही केव्हा जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती करतान तेव्हा आणि सेंद्रिय शेती केल्याने निरोगी आरोग्य राहते जसे की रासायनिक खतांच्या वापरामुळे व किटकनाशकांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे म्हणून सेंद्रिय शेती केल्याने पैशाची बचत व भरघोस उत्पन्न आणि निरोगी आयुष्य व येणाऱ्या उज्वल भविष्य होते व आधुनिक पद्धतीचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये दिसून येतो .
गोपाल उगले
Share your comments