बंगालच्या उपसगारात (bay of bengal) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झाले आहे. आता ते आणखी तीव्र झाले आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rainFall) पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात तुफान पाऊस झाला आहे. ढगफुटीच्या घटनाही मोठ्या घडल्या आहे. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटीच्या घटना घडत आहेत. गेल्या मंगळवारी (ता. सात) एका दिवसात राज्यात तब्बल ८५ पेक्षा जास्त ठिकाणी ढगफुटी झाली. यात सर्वाधिक म्हणजे ४२ ढगफुटी एकट्या मराठवाड्यात झाली. उर्वरित ढगफुटी महाराष्ट्राच्या अन्य भागात झाली. ढगफुटीचा प्रदेश बनलेल्या महाराष्ट्रात यंदा डिसेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे एका माध्यमाला दिली आहे.
हेही वाचा : राज्यात येत्या 24 तासात वाढणार पावसाचा जोर, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र
प्रा. जोहरे पुढे बोलतना म्हणाले की मॉन्सून पॅटर्न बदलला आहे. मॉन्सून बरोबरच चक्रीवादळ, गारपीट तसेच ढगफुटीचा पॅटर्न बदलाने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वितरण बदलले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र आता ढगफुटीच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. मॉन्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने बदललेला बाष्पीभवन दर कारणीभूत आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करीत सेंद्रिय खतांनी ऑरगॅनिक कार्बन वाढवीत आयुर्मान वाढवत घराघरांत शिरणारा कॅन्सर रोखणे शक्य आहे’’, असे मतही प्रा. जोहरे यांनी केले आहे.
कमी वेळात प्रचंड प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे रस्ता उखडून जातो. मोठमोठे खड्डे पडतात. घरे किंवा भिंती पडतात. लाखो लीटर पाणी आल्याने गाळ जमतो व गाय-बैल-म्हैस अशी मोठी जनावरे, दुचाकी-चारचाकी वाहने तर कधी ट्रकसारखी मोठी वाहनेही पाण्यात वाहून जाऊ शकतात; म्हणूनच अशा पावसाला ढगफुटीला फ्लॅशफ्लड म्हणतात. ढगफुटी होताना पाण्याच्या थेंबांचा आकार वाटण्याच्या आकाराएवढा किंवा त्यापेक्षा मोठा असतो. विजा चमकतात व ढगांचा गडगडाट ऐकू येतो. आकाश पांढऱ्या रंगाचे दिसते.
Share your comments