1. बातम्या

MFOI Award 2023 Day 1 : MFOI अवॉर्ड सोहळा कार्यक्रमात भारतातील नामवंत कंपन्या सहभागी; जाणून घ्या त्यांची नावे

याशिवाय या कार्यक्रमातील बँकिंग भागीदार स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय बँक देखील सहभागी झाली आहे. तसेच, या कार्यक्रमातील किटचे प्रायोजक धानुका ऍग्रीटेक लिमिटेड आहेत. तर अन्न आणि पेय भागीदार आनंद, बिरा, MDH, सफाल, DCM श्रीराम शुगर आणि डाबर हरे कृष्णा गोशाळा आहेत.

MFOI news

MFOI news

New Delhi : देशातील शेतकऱ्यांना एक वेगळी ओळख देण्यासाठी अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने सुरू केलेला 'मिलिनिअर फार्मर्स ऑफ इंडिया अवॉर्ड स्पॅांन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टर्स' कार्यक्रम आजपासून (दि.6) डिसेंबर सुरू झाला आहे. 6,7 आणि 8 डिसेंबर या तीन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील अनेक मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यात 40 हून अधिक कंपन्या सहभागी आहेत. या सर्व कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी MFOI पुरस्कार 2023 च्या या कार्यक्रमात त्यांचे स्टॉलही लावले आहेत.

याशिवाय या कार्यक्रमातील बँकिंग भागीदार स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय बँक देखील सहभागी झाली आहे. तसेच, या कार्यक्रमातील किटचे प्रायोजक धानुका ऍग्रीटेक लिमिटेड आहेत. तर अन्न आणि पेय भागीदार आनंद, बिरा, MDH, सफाल, DCM श्रीराम शुगर आणि डाबर हरे कृष्णा गोशाळा आहेत.

MFOI कार्यक्रमात कोणत्या कंपन्या सहभागी?
दिल्लीत शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडत आहेत. शेतकऱ्यांसाठी याठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यात कोरोमंडल फ्यूचर पॉझिटिव्ह, एफएमसी कॉर्पोरेशन केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, होंडा, सोमानी सीड्स, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (एनसीडीईएक्स), आणि एजीएमए प्रायव्हेट लि. याशिवाय नॉलेज पार्टनर MANAGE, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि डिजिटल पार्टनर डेलीहन्ड देखील उपस्थित आहेत.

भारत सर्टिस ऍग्रिसायन्स लि., देहात, जेनक्रेस्ट, गोकुळ ऍग्री इंटरनॅशनल लि., महिंद्रा फायनान्स, पीआय इंडस्ट्रीज, सैनी, स्टिहल, विलोवुड, एडीएस ऍग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड, अमूल, एयू स्मॉल फायनान्स बँक, भोलानाथ, कृषी प्रार्थना. एलोरा, डॉ. गोयल, ग्रोव्हीटी, आयएसएबी, बारामती एॅग्रो इत्यादी कंपन्यांना याठिकाणी सहभागी झाल्या आहेत.

ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा देखील सहभागी
देशातील अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरणने सुरू केलेला 'द मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023' मध्ये भारतातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने त्यांचे ओजा, नोवो आणि युवो सीरिजचे ट्रॅक्टर मॉडेल प्रदर्शित केले आहेत. कंपनीने आपले Mahindra 585, YUVO TECH+ ट्रॅक्टर, Mahindra OJA 3140 ट्रॅक्टर, Mahindra NOVO 605 DI 4WD V1 Tractors, Mahindra NOVO 655 DI PP V1 Tractor, Mahindra OJA 2121 Tractor, Mahindra OJA 2121 Tractor, Mahindra OJA 3140 Tractors आणि Mahindra 75WD Tractor आणि रोटाव्हेटर यांत्रिकीकरण घेऊन सहभागी झाले आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण असणार:
या कार्यक्रमासाठी आचार्य देवव्रत-गुजरातचे राज्यपाल, नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, परषोत्तम रूपाला- मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास मंत्री, पी.सथसिवम - भारताचे सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल, प्रताप सारंगी- लोकसभा सदस्य ओडीशा, महेंद्रसिंग सोळंकी - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती, पोचा ब्रम्हानंदा - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती - आंध्रप्रदेश, शंकर लालवानी - लोकसभा सदस्य -इंदोर हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.

"प्रत्येक शेतकरी करोडपती होण्याची आकांक्षा बाळगतो आणि ज्यांनी ही कामगिरी केली त्यांचा सन्मान केला पाहिजे. लोकांचा शेतकरी आणि शेतीबद्दलचा विचार बदलणे हा त्यांचा उद्देश आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडीलही शेतकरी होते आणि त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शेतीही केली होती.जेव्हा जेव्हा त्यांनी शेती सोडून इतर क्षेत्रांकडे पाहिले तेव्हा कोणी ना कोणी रोल मॉडेल म्हणून सादर केले. पण, कृषी क्षेत्रात ना कुठला रोल मॉडेल आहे ना तो मोठ्या प्रमाणावर मांडला जात आहे. हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मी वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नाला ‘MFOI पुरस्कार’ असे नाव देण्यात आले आहे. कृषी जागरण भविष्यात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक पुरस्कार शो आयोजित करेल."
एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
“गेल्या काही दशकांमध्ये कृषी क्षेत्रातील महिलांची भूमिका झपाट्याने वाढली आहे. महिला शेतकऱ्यांनी या क्षेत्रात प्रत्येक पावलावर आपले योगदान दिले आहे, तरीही महिला या क्षेत्रात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. मला आशा आहे की, 'द मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये त्या महिला शेतकऱ्यांना पुरस्कृत केल्याने ज्यांनी कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनून चांगली कामगिरी केली आहे, महिला शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता बदलेल. तसेच हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे.”
शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
English Summary: MFOI Award 2023 Day 1 Renowned companies of India participated in the MFOI Award Ceremony Know their names Published on: 06 December 2023, 03:47 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters