1. बातम्या

MFOI 2024 Letest Update : छत्तीसगडमध्ये कृषी जागरण आयोजित 'समृद्ध किसान उत्सव-२०२४' पार

Samruddha Kisan Utsav : या समृद्ध कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. याशिवाय महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि इतर अनेक कंपन्या या समृद्ध कृषी महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर या कृषी महोत्सवाची थीम 'धान पिकातील रोग आणि कीड व्यवस्थापन, बाजरी लागवड, ट्रॅक्टर उद्योगातील नवीन शोध आणि ट्रॅक्टरची देखभाल' यावर चर्चा करण्यात आली.

Samruddha Kisan Utsav-2024

Samruddha Kisan Utsav-2024

MFOI Samridh Kisan Uttsav 2024 : कृषी जागरण गेल्या २७ वर्षांपासून कृषी क्षेत्रात उत्तम काम करत आहे. त्याचबरोबर कृषी जागरण वेळोवेळी कृषी मेळावे आयोजित करत असते. त्याचा उद्देश कृषी तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांमध्ये तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे, जनजागृती करणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. जेणेकरून शेतकरी जागरूक व्हावेत. यासाठी देशभरातील शेतकऱ्यांसाठी कृषी जागरण नवनवीन गोष्टी घेऊन येत असते.

गतवर्षी ६ ते ८ डिसेंबर २०२३ दरम्यान 'महिंद्रा मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स-२०२३'चे आयोजन पुसा IARI फेअर ग्राउंड नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम कृषी जागरणने आयोजित केला असून महिंद्रा ट्रॅक्टर्सने प्रायोजित केला होता. या तीन दिवसीय मिलिनीयेर शेतकरी मेळाव्यात कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. याशिवाय देशभरातून हजारो शेतकरी या शेतकरी मेळाव्यात सहभागी झाले होते. यादरम्यान देशभरातील शेकडो शेतकऱ्यांना 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स-२०२३' ने सन्मानित करण्यात आले. याच क्रमाने कृषी जागरणने आज (दि.१६) रोजी छत्तीसगडमधील भाटापारा येथे MFOI समृद्ध किसान उत्सव २०२४ मेळाव्याचे आयोजन केले.

या समृद्ध कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. याशिवाय महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि इतर अनेक कंपन्या या समृद्ध कृषी महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर या कृषी महोत्सवाची थीम 'धान पिकातील रोग आणि कीड व्यवस्थापन, बाजरी लागवड, ट्रॅक्टर उद्योगातील नवीन शोध आणि ट्रॅक्टरची देखभाल' यावर चर्चा करण्यात आली.

काय आहे समृद्ध किसान उत्सव मेळावा

कृषी जागरणने MFOI समृद्ध किसान उत्सव २०२४ मेळाव्याचे आयोजन आज (१६ जानेवारी) रोजी छत्तीसगडच्या भाटापारा येथील एलेसूर येथील DKS कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर अँड रिसर्च स्टेशन येथे केले आहे. या एकदिवसीय समृद्ध कृषी महोत्सवाची थीम "धान पिकातील रोग आणि कीड व्यवस्थापन, बाजरी लागवड, ट्रॅक्टर उद्योगातील नवकल्पना आणि ट्रॅक्टरची देखभाल यावर चर्चा" आहे.

हा मेळावा शेतकर्‍यांना सक्षम बनवण्यासाठी आणि समृद्ध भारतासाठी जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी समर्पित आहे. या कृषी महोत्सवात ट्रॅक्टर उद्योगातील नाविन्य आणि ट्रॅक्टरच्या देखभालीबाबत महिंद्रा ट्रॅक्टरचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत.

या कार्यक्रमासाठी नारायण सिंह लवत्रे- उपसंचालक फलोत्पादन विभाग- बिलासपूर, भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी पुरस्कार विजेते डॉ.राजाराम त्रिपाठी, डॉ.अरुणकुमार त्रिपाठी-केव्हीके बिलासपूर प्रमुख, मनोज चौहान सहसंचालक/पी.डी. विभाग, डॉ. आर.के.एस त्रिवारी डीन बीटीएस कृषी महाविद्यालय-बिलासपूर, डॉ. अजय वर्मा, संचालक विस्तार सेवा IGKV रायपूर, अवनीश कुमार शरण-जिल्हाधिकारी- बिलासपूर आणि डॉ. गिरीश चंदेल- कुलगुरू इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ (IGKV) रायपूर येथील मान्यवर उपस्थित होते.

'MFOI किसान भारत यात्रा २०२३-२४' म्हणजे काय?

'MFOI किसान भारत यात्रा २०२३-२४' मध्ये ग्रामीण परिसराचा कायापालट करणाऱ्या स्मार्ट गावांची कल्पना आहे. MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट डिसेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत देशभर प्रवास करण्याचे आहे. ज्यामध्ये चार हजाराहून अधिक ठिकाणांचे मोठे नेटवर्क समाविष्ट केले आहे. यात २६ हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापले जाणार आहे. या अभियानाचा प्राथमिक उद्देश शेतकरी समुदायामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी वाढवून त्यांना सक्षम करता येईल. यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची शेतकऱ्यांना माहिती करून देणे आहे.

English Summary: MFOI 2024 Letest Update Chhattisgarh Samruddha Kisan Utsav-2024 krishi jagarn news Published on: 16 January 2024, 04:43 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters