1. बातम्या

आता बनेल गायीच्या शेणापासून पिण्यायोग्य पाणी; अमेरिकन शास्त्रज्ञांनी केले तंत्रज्ञान विकसित

समुद्राचे पाणी खारे असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.परंतु हेच खारट पाणी पिण्यायोग्य करता येईल. असं जर कोणी सांगितले तर सहसा विश्वास कोणीच ठेवणार नाही. परंतु हे जे तुम्ही आता वाचलं हे सत्य आहे. कारण अमेरिकन शास्त्रज्ञांनी ही अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवलीआहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
bosten university

bosten university

समुद्राचे पाणी खारे असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.परंतु हेच खारट पाणी पिण्यायोग्य करता येईल. असं जर कोणी सांगितले तर सहसा विश्वास कोणीच ठेवणार नाही. परंतु हे जे तुम्ही आता वाचलं हे सत्य आहे. कारण अमेरिकन शास्त्रज्ञांनी ही अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवलीआहे.

 अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी च्या शास्त्रज्ञांनी शेणाचे एका फिल्टर मध्ये रूपांतर करून त्यापासून खारे पाणी गोडे करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामध्ये शास्त्रज्ञांनी  सौर पॅनल ऐवजीसूर्यप्रकाशाचा अत्यंत शास्त्रशुद्ध आणि चपखल वापर केलाआहे. हा प्रयोग करण्यासाठी शास्त्रज्ञांनी येथील स्थानिक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेणगोळा केले.

हे शेन त्यांनी सुमारे 1700 सेल्सिअसपर्यंत तापवून त्यातील बॅक्टेरिया वेगळे केले.  त्यामुळे शेणा रूपांतर कार्बन पावडर मध्ये झाले. नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर यीझेंगत्यांनी या पावडरचे फेसात रूपांतर करून त्याचा वापर फिल्टर म्हणून खारे पाणी गोड करण्यासाठी केला. यामधून त्यांना पिण्यायोग्य ताजे पाणी मिळाले.या प्रयोगासाठी आम्ही पूर्णतः नैसर्गिक व शाश्वत सामग्री वापरली.या सामग्रीने आपले काम चोख बजावले.  ही सामग्री स्वस्त व रस्ता असून त्याचे उत्पादन करणे सहज सोपे आहे असे त्या म्हणाल्या.

 

काय प्रक्रिया होते या प्रयोगात?

 या प्रक्रियेत शेणाच्या पावडर पासून तयार झालेले फिल्टर समुद्राच्या पृष्ठभागावर टाकले जाते.हे फिल्टर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर सक्रिय होते. त्यानंतर त्या खालील खाऱ्या पाण्याचे वाफेत रूपांतर होऊन  त्यापासून पिण्यायोग्य पाणी मिळते असे हे सहज सोपे तंत्रज्ञान आहे.( माहिती संदर्भ- पुण्यनगरी )

English Summary: make a drinking water from dung invented by american reasercher Published on: 23 October 2021, 08:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters