तीन महिन्यांपूर्वी लंपी आजाराने थैमान घातले होते. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता. यामुळे जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते. असे असताना आता गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला घोडेगावचा जनावरांचा बाजार शुक्रवार पासून सुरू होणार आहे.
याबाबत माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांचा बाजार नियमित सुरू होणार आहे. यामुळे लाखोंची उलाढाल पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
त्यामुळे शेतकरी, पशुपालक, व्यापारी, दलाल व व्यवसायिकांनी बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले. जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी लंपी आजाराने थैमान घातले होते.
इकोदीप निर्मिती उद्योगामुळे महिलांना मिळणार रोजगार
नेवासा तालुक्यात देखील अनेक शेतकर्यांची जनावरे मरण पावली. आजाराचा वाढता प्रसार व घातकता लक्षात घेता, प्रशासनाच्या वतीने 9 सप्टेंबर 2022 पासून घोडेगाव येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता.
असे असताना आता मात्र हा आजार कमी झाला आहे. यामुळे यामुळे हे बाजार सुरू करण्याची मागणी केली जात होती. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपचार, लसीकरण यामुळे लंपी आजार आटोक्यात आला आहे.
आम आदमीचा आता महाराष्ट्रातही जलवा! भल्याभल्यांना आव्हान देत थेट जिंकली सरपंचपदाची खुर्ची
त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाची बाजार पूर्ववत करण्याची मागणी होती. याचा विचार करून आता बाजार सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य
जनावरे रोडवर सोडली तर होणार गुन्हा दाखल! नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल
आता शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना..
Published on: 21 December 2022, 05:21 IST