News

शेतमालाच्या उत्पादनात घट झाली की, दरात वाढ होणारच हे बाजारपेठेचे सूत्र आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतदेखील हेच सूत्र लागू झाल्याचं दिसत आहे.

Updated on 03 June, 2022 3:32 PM IST

Tomato Price: शेतमालाच्या दरात चढ-उतार होत असतात. सध्या कांद्याने शेतकऱ्यांना रडवले असले तरी भाजीपाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळला आहे. भाव नसल्यास टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची पाळी येत असते मात्र यंदा टोमॅटो उत्पादकांना चांगले दिवस येणार आहेत. याचं कारण म्हणजे टोमॅटोच्या दरात झालेली वाढ. दरम्यान, राज्यातील मुख्य बाजारपेठेत टोमॅटोचे दर हे 100 रुपये किलो असा होता. आता मात्र हेच दर स्थानिक पातळीवरही करण्यात आले आहे.

अर्थातच याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. भाज्यांना मिळणारा योग्य दर तसेच हंगामी भाजीपाला यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे. खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असताना भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

टोमॅटो उत्पादनात घट
शेतमालाच्या उत्पादनात घट झाली की, दरात वाढ होणारच हे बाजारपेठेचे सूत्र आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतदेखील हेच सूत्र लागू झाल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे बरेच नुकसान होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी टोमॅटोचे बरेच नुकसान झाले.

आता मोंदींचे 2 हजार थेट तुमच्या घरी येणार; बँकेत जाण्याचा त्रासही मिटणार

यातून शेतकऱ्यांना बराच आर्थिक फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे दुर्लक्ष केले. आणि यातून टोमॅटो उत्पादनात घट झाली. परिणामी टोमॅटो शंभरीपार गेले आहे. आता मुख्य बाजारपेठेसोबत स्थानिक पातळीवरही टोमॅटोचे दर वाढले आहेत. टोमॅटो बरोबर इतर भाजीपाल्यांचे देखील दर वाढले आहेत.

मागणी अधिक पुरवठा कमी
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरिपासाठी क्षेत्र मोकळे करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे पाठ फिरवली. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली असली तरी तेवढ्या प्रमाणात पुरवठा होत नाही. टोमॅटो बरोबरच शेवगा, मिरची, वांगी या भाजीपाल्यांची दरातही वाढ होत आहे.

महत्वाच्या बातम्या:
भाजपच्या मैदानात राष्ट्रवादीची बाजी! सुनील आण्णांनी नाचून केला आनंद व्यक्त
मोठ्या मनाची कोंबडी; भर वादळात दिला मांजरीच्या पिल्लांना आसरा

English Summary: increase in tomato prices
Published on: 03 June 2022, 03:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)