एरंडचं झाड आपण नेहमी पाहिलं असेल. एरंडही वनस्पती बहुवर्षांयू असून याचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. मुळची अफ्रिकेतील असलेली वनस्पती आता भारतात सर्वत्र दिसते. ३-५ मी. उंचीची पर्यंत वाढणारे झाड याचे पान हस्ताकृती विभागलेली असतात. ही वनस्पती साध जरी दिसत असली तरी उत्पन्न अधिक देत असते. आपल्या राज्याला साधारण दोन कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळवून देते. महाराष्ट्रात एरंडाचे क्षेत्र ९ हजार हेक्टर असून त्यापासून मिळणारे उत्पादन २ हजार मेट्रीक टन आहे. बुलडाण्यात तर यांची लागवड अधिक होत असते. दरम्यान एरंडीच्या बियांवरती एक संशोधन करण्यात आले असून यामुळे उत्पादनात अधिक वाढ होणार आहे.
जीसीएच ची वैशिष्ट्ये
आपलं उत्पादन वाढविण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही. यासाठी आपल्याला फक्त शेतीची पद्धत बदलावी लागेल. कृषी विद्यापीठाच्या (एसडीएयू), पालमपूर च्या शास्त्रज्ञांनी या जीसीएच -७ एरंडीला विकसीत केले आहे, जी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल. जर नव्या पद्धतीने आपण याची शेती केली तर प्रति हेक्टर ४ टनापेक्षा अधिक एरंडीचं उत्पादन होऊ शकते, असा दावा शास्त्राज्ञांनी केला आहे.
भारतात होतं एरंडीचं उत्पादन अधिक
जीसीएच -७ चे वाण हे प्रतिकूल परिस्थिती आणि खराब हवामानातही तयार करण्यास सक्षम आहे. आपल्या देशात ९० टक्के एरंडचं उत्पादन केले जाते. आपल्या राज्यातही एरंडचं अधिक उत्पादन केले जाते. राज्याला साधारण २ कोटी रुपयांचे उत्पन्न एरंडपासून मिळते. एरंडपासून काढण्यात आलेल्या तेलाचा वापर विशेषतः फार्मास्युटिकल्स आणि विमानचालन सेवांमध्ये होतो.
मूळची आफ्रिकेतलं ही वनस्पती उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते. भारतात सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते. हे लहान झाड असून त्याचे खोड ठिसूळ असते. पाने हस्ताकृती, विभागलेली पण साधी असतात. पानांचे खंड दातेरी आणि देठ लांब असतात. पानाच्या खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखाडी छटा दिसते. शेंड्याकडे उभ्या मंजरीवर द्विलिंगी हिरवट फुले डिसेंबर-मार्च मध्ये येतात. काटेरी बोंडात एक-बीजाणू तीन बिया असतात. बिया कठिण, लांबट व पिंगट असून त्यावर चित्रविचित्र ठिपके असतात. एरंडाचे सर्व भाग औषधी आहेत. याचे मूळ दाहक व वातनाशक आहे. ते सूज, ज्वर, दमा, कफ व आतड्यातील कृमी यांवर उपयुक्त असते. पानांचा काढा दुग्धवर्धक असतो. बियांपासून काढलेल्या तेलाला एरंडेल म्हणतात.
Share your comments