1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! एक एकर क्षेत्रातून कमवायचे असतील लाखों रुपये तर करा 'या' पिकाची शेती

हरियाणातील घरंदा येथील एक शेतकरी त्याच्या शेतात चंदनाची लागवड करतो. त्यांनी अनेक बिघा जमिनीवर चंदनाची रोपे लावली आहेत जी हळूहळू वाढत आहेत. त्यांनी सांगितले की, चंदनाचे रोप 12 वर्षात तयार होते. जर एखाद्या व्यक्तीने एक रोप लावले तर त्याला 5-6 लाख रुपये मिळू शकतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
sandalwood

sandalwood

शेतकरी बांधवांनो काळाच्या ओघात शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होत आहे. असे असले तरी, अजूनही असे अनेक शेतकरी आहेत जे पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या पारंपरिक शेतीमध्ये अडकून पडले आहेत.

कृषी वैज्ञानिकांच्या मते, शेतीमधून अधिक नफा मिळवण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे महत्त्वाचे आहे. यामुळेच आज आपण चंदनच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की चंदनाची शेती भारतात खूपच कमी भागात केली जाते. यामुळे याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हरियाणातील घरंदा येथील एक शेतकरी त्याच्या शेतात चंदनाची लागवड करतो. त्यांनी अनेक बिघा जमिनीवर चंदनाची रोपे लावली आहेत जी हळूहळू वाढत आहेत. त्यांनी सांगितले की, चंदनाचे रोप 12 वर्षात तयार होते. जर एखाद्या व्यक्तीने एक रोप लावले तर त्याला 5-6 लाख रुपये मिळू शकतात. या शेतकऱ्याने सांगितले की 1 एकरमध्ये 600 चंदनाची रोपे लावली जाऊ शकतात आणि 12 वर्षांनी लाखों रुपये कमविले जाऊ शकतात.

शेतकरी मित्रांनो आम्ही इथे आपणास सांगू इच्छितो की, कृषी जागरण मराठी चंदन शेती मधून किती उत्पन्न मिळू शकते याबाबत कुठलीच पुष्टी करत नाही. सदर शेतकऱ्याने एका मीडिया एजन्सीला चंदनच्या शेतीतुन लाखोंची कमाई केली जाऊ शकते असा दावा केला आहे. कृषी जागरण मराठी याचा दावा करत नाही यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे राहणार आहे. सदर शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो गेल्या 3 वर्षांपासून चंदनाची शेती करतो आणि इतर लोकांकडून करून घेतो.

चंदनाची शेती करण्यासाठी चंदनाची रोप आपणास विभागाकडून उपलब्ध करून घ्यावे लागतील, जे खूप महाग असतात. परंतु जर तुम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर आपणांस रोपे सुमारे 400-500 रुपये प्रति नग या दराने मिळू शकता.

अडीच वर्षाची चंदनाची रोपे शेतात लावने योग्य मानले जाते. 2-2.5 अडीच वर्षात चंदनाचे रोप 2-2.5 फुटांपर्यंत वाढते, चंदनची रोपे कोणत्याही हंगामात लावता येते. तथापि, हिवाळ्यात या वनस्पतीची लागवड करू नये असा सल्ला दिला जातो. एका झाडाला आठवड्यातून 2-3 लिटर पाणी लागते. संतुलित पाणी दिल्यास चंदनाच्या झाडाला कोणताही रोग लागतं नाही आणि त्याची वाढ चांगली होते.

English Summary: If you want to earn lakhs of rupees from one acre of land, then cultivate this crop Published on: 05 April 2022, 12:11 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters