News

भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था हीकृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.भारतामध्ये शेतकरी शेती करीत असतानाअनेक जोड धंदे करतात.

Updated on 21 May, 2022 10:34 PM IST

 भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था हीकृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.भारतामध्ये शेतकरी शेती करीत असतानाअनेक जोड धंदे करतात.

या जोड धंद्यांमध्ये प्रमुख्याने पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याखालोखाल शेळीपालन, कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय केले जातात. परंतु आता शेतकरीहे परंपरागत जोडव्यवसाय यांसोबतच वराह पालन, ससे पालन आणि मधमाशी पालन यासारख्या जोडव्यवसाय इकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. खरे पाहायला गेले तर शेतकऱ्यांचा कल या व्यवसायांकडे जास्त प्रमाणात वळणे खूप महत्त्वाचे आहे.

यासाठी केंद्र व राज्य शासना मार्फत देखील  विविध प्रकारच्या योजनाराबवून शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यात येते. यामध्ये जर आपण मधमाशी पालनाचा विचार केला तर आता बरेच शेतकरी या व्यवसायाकडे वळत असून या व्यवसायाला चांगल्या व्यावसायिक संधी देखील आहे. मध आणि मेण ही उत्पादने या व्यवसायातून मिळत असल्याने व या उत्पादनांना मागणी बाजारात चांगली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळणे महत्त्वाच्या आहे.

 महाराष्ट्रातील मधमाशी पालन व्यवसायाची स्थिती

 महाराष्ट्राला अनेक प्रकारचे भौगोलिक परंपरा लाभली असून यामध्ये पश्चिम घाट हा विविध पर्वतरांगांनी नटलेला आहे. राज्यातील बहुतांश भागात मधमाशी पालन आला उपयुक्त असे वातावरण असून व त्याच्या सोबतीला शेतकर्‍यांना शासनाकडून देखील हा व्यवसाय एक उद्योग रूपात  उभा राहावा यासाठी विविध योजना राबवित आहेत.

याचाच परिपाक म्हणून राज्यातील 31 जिल्ह्यातील 185 तालुक्यातील 1147 गावांमधील 5103 पेक्षा जास्त शेतकरी या व्यवसायाकडे वळले असून या माध्यमातूनस्वतःची आर्थिक उन्नती करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटातील डोंगरदऱ्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य देत आहे. मधमाशी पालन व्यवसाय हा शेती व्यवसायाला देखील खूपच महत्त्वाचा आहे.

मधमाशांच्या परागीकरण यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास देखील मदत होते व त्यासोबत मध आणि मेण हे उत्पादनदेखील मिळतात.मधमाशांचे वेगवेगळे प्रकार येतात. यामध्ये सातेरी आणि मेली फेरा या जाती खूप महत्त्वाचे आहे. जातीनुरूप मधमाशी पालनाचा बसायचा विचार केला तर मेली फेरा मधमाशीपालन हे मराठवाड्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये केली जाते वसा तेरी मधमाशीपालन हे अहमदनगर, पुणे, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. वर्षभर सदाहरित असणाऱ्यावनविभागात या सातेरी मधमाशीपालनास चांगली संधी आहे.

 मधमाशीपालनातील व्यावसायिक संधी

 या व्यवसायातून मिळणारे मध प्रमुख उत्पादन असून ते आरोग्यदृष्ट्या शरीराला खूप महत्त्वाचे आहे. एक शक्तिदायक व पौष्टिक अन्न व औषध आहे. मधमाशा पासून मेण मिळते. याचा वापर सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारची औषधे व चर्चमधील मेणबत्त्या तयार करण्यासाठी होतो.

तसेच परागीभवन क्रिया होत असल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.पराग व मधमाशांचे विष संकलन होत असून रॉयल जेली चीही संकलन होत आहे.

जर महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, रायगड, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडाराया व इतर जिल्हे मधमाशी उद्योगासाठी खूप पोषकजिल्हे आहेत.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Lemon Fertilizer Management:'या' खतांचा वापर केला तर येईल लिंबूचे भरघोस उत्पादन आणि मिळेल बक्कळ नफा

नक्की वाचा:40 गोणी कांदा, शेतकऱ्याला आडतवाल्यालाच द्यावे लागले 7 रुपये, सांगा कसा जगणार शेतकरी

नक्की वाचा:दूध उत्पादन वाढवण्यासाठी अझोला उपयुक्त; लागवड तंत्रज्ञान आणि आश्चर्यजनक फायदे

English Summary: honeybee rearing bussiness give financial support to farmer
Published on: 21 May 2022, 10:34 IST