1. बातम्या

हरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक

हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. धान्याच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) हा लाभ मिळणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Mera Pani Meri Virasat Scheme

Mera Pani Meri Virasat Scheme

हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. धान्याच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) हा लाभ मिळणार आहे. सध्याच्या घडीला हरियाणात 1,26,928 हेक्टरवर धान्याशिवाय इतर पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. अशा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांना 25 जूनपर्यंत मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या (Mera Pani Meri Virasat Scheme) पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच एग्रो फारेस्ट्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी एका एकरात 400 झाडे लावली असतील तर त्यांना 10 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

 

योजनेचा लाभ कसा मिळवाल?

मेरा पानी-मेरी विरासत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेहमीच्या धान्याऐवजी मका, बाजरी या कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. या पिकांसाठी किमान हमीभाव दिला जाईल. तसेच पीक विमा योजनेचाही लाभ मोफत मिळेल.मेरा पानी-मेरी विरासत योजनेच्या पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना आपण किती एकरात पीक घेतले आहेत, ही माहिती नमूद करावी लागेल. या माहितीची पडताळणी केली जाईल. यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. 

यामध्ये कोणतेही अडथळे येता कामा नये, असे निर्देश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे झज्जर जिल्ह्यातील ढाकला गावातील शेतकऱ्यांनी यावेळी सामूहिकरित्या धान्याची शेती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

English Summary: Haryana government's scheme, financial assistance of Rs. 7000 to farmers from the government Published on: 15 June 2021, 04:41 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters