गेल्या काही दिवसांपासून महागाईमुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. यामुळे सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. असे असताना आता सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल कंपनी अदानी विल्मरनेच्या किमतीत प्रति लीटर ३० रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा सोमवारी केली आहे.
यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जागतिक बाजारात खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे भारतात तेलाच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वाधिक कपात सोयाबीन तेलाच्या दरात झाली असून. नव्या किमतीची पाकिटे लवकरच बाजारात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळॆ आता कोलमडलेले बजेट हे काहीसे सावरणार आहे.
सोयाबीन आणि राईस ब्रॅन ऑईलच्या दरात प्रती लीटर १४ रुपयांची अलीकडेच कपात केली होती. सरकारने जागतिक बाजारातील किमतीतील घसरणीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात यावा, असे निर्देश कंपन्यांना दिले होते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजार पडलेला असल्यामुळे भारतातील खाद्य तेलाच्या किमती पुढील महिन्यात आणखी कमी होतील. असेही म्हटले जात आहे.
तब्बल 9000 पेक्षा जास्त मृत शेतकऱ्यांच्या खात्यात आले पीएम किसानचे पैसे, चौकशी होणार
अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आंग्शू मलिक यांनी सांगितले की, नव्या किमतीची तेलाची खेप लवकरच बाजारात पोहोचेल. १५ जुलै पूर्वीची खरेदी असलेली तेलाची खेप २५ जुलै पर्यंत बाजारात येईल. यामुळे आता सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे. इतरही किमती कमी करण्याची मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
तुम्हाला 7 वा वेतन आयोग, 8 वा वेतन आयोग, आम्ही इकडे २४ तास मरतोय, आता 8 वा वेतन आयोग लागू होणार
आम आदमीची देश जिंकण्याची तयारी सुरू, दिल्ली पंजाबनंतर आपचा मध्यप्रदेशातही विजय
गणित करा आणि वापरा फुकट वीज! जाणून घ्या सविस्तर, होईल फायदा..
Published on: 19 July 2022, 01:02 IST