आले हे आरोग्यदायी आहे, कोरोना काळात सगळीकडे आहारामध्ये अद्रकाचा वापरण्याचा ट्रेंड वाढला. परंतु मागील तीन-चार वर्षांपासूनचा विचार केला तर सन 2017 पासून अद्रकाचे दर सातत्याने कमी होत असल्याने आले उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. मालेगाव जवळील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आल्याचे विक्रमी उत्पादन होते.
आले हे आरोग्यदायी आहे, कोरोना काळात सगळीकडे आहारामध्ये अद्रकाचा वापरण्याचा ट्रेंड वाढला. परंतु मागील तीन-चार वर्षांपासूनचा विचार केला तर सन 2017 पासून अद्रकाचे दर सातत्याने कमी होत असल्याने आले उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. मालेगाव जवळील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आल्याचे विक्रमी उत्पादन होते. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर कन्नड, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांमध्ये आल्याची विक्री उत्पादन होते तसेच मोठ्या प्रमाणात आल्याची शेती केली जाते. कन्नड ही आल्यासाठीची मोठी बाजारपेठ आहे. कन्नड वरूनच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये जसे की, नासिक मालेगाव, नागपूर, अमरावती, जळगाव इत्यादी मार्केटमध्ये जवळजवळ 500 ते 600 टनांच्या आसपास आद्रक विक्रीसाठी पाठवले जाते.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने अद्रकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली. अद्रकाचे विक्रमी उत्पादन घेऊन कमी भाव मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. आल्याचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर, एकरी दीड लाख रुपये आल्यासाठी खर्च येतो.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. नाशिक, मालेगाव बाजार समिती यांचा विचार केला तर बेंगलोर वरून दररोज 8 टन आले विक्रीसाठी येते. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील आले मध्यप्रदेश, , उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्यात जाते. आपल्याकडे आलेला बंगळुरूवरून आलेल्या अद्रकाचा सामना करावा लागत असल्याने स्थानिक अद्रकाचे भाव कमी होत आहेत.
चार वर्षातील आल्याचे भाव
2017- 25 रुपये
2018- 15रुपये
2019- 13 रुपये
2020- 16 रुपये
वरील किमतींचा आलेख पाहिला तर 2017 पासून सातत्याने आल्याचे भाव कमी होत आहेत.
माहिती स्त्रोत- डेली हंट
Share your comments