भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेली एक स्वयंशासित संस्था आहे जी भारतातील अन्न सुरक्षा आणि नियमांसाठी कार्य करते.
FSSAI हा एकमेव प्राधिकरण आहे जो व्यापारी, उत्पादक आणि खाद्य दुकान मालकांसह खाद्य व्यवसाय ऑपरेटरना परवाना जारी करते. कोणत्याही प्रकारच्या केटरिंग व्यवसायासाठी फूड लायसन्सिंग अत्यंत आवश्यक आहे FSSAI नोंदणी हा 14 अंकी नोंदणी क्रमांक किंवा खाद्य परवाना क्रमांक असतो जो खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर छापलेला असणे आवश्यक आहे.
FSSAI परवान्यांचे प्रकार:
- भारतात 3 प्रकारचे FSSAI फूड लायसन्स आहेत; मूलभूत, राज्य आणि केंद्र
Basic FSSAI License मूलभूत FSSAI परवाना:
12 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या छोट्या प्रमाणातील खाद्य व्यवसायात गुंतलेल्या अन्न व्यवसाय ऑपरेटरसाठी असते. हा प्राथमिक प्रकारचा अन्न परवाना आहे आणि तो नियामक संस्था FSSAI द्वारे 500 लिटर/कमी क्षमतेच्या डेअरीसाठी जारी केला जातो.
चहाची दुकाने, कॅन्टीन, फूड प्रोसेसर आणि लहान गोदामांसारख्या व्यापारांसाठी हा परवाना आवश्यक आहे. जेव्हा व्यवसाय आकार आणि नफा वाढू लागतो तेव्हा ते अपग्रेड केले जाऊ शकते.
FSSAI राज्य परवाना :
12 लाख - 20 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या फूड बिझनेस ऑपरेटरसाठी असतो. उत्पादक, स्टोरेज, वाहतूकदार, किरकोळ विक्रेते, विक्रेते, वितरक इत्यादींसाठी राज्य FSSAI परवाने आवश्यक आहेत.
FSSAI केंद्रीय परवाना:
केंद्रीय FSSAI परवाना मिळविण्यासाठी ज्यांची वार्षिक उलाढाल रु. 20 कोटी पेक्षा जास्त आहे, अशा फूड बिझनेस ऑपरेटरना हा परवाना आवश्यक आहे.
भारतातील FSSAI नोंदणी / परवान्यासाठी फी संरचना Fees structure for FSSAI registration
मूलभूत FSSAI परवान्यासाठी शुल्क एका वर्षासाठी INR 100 वर निश्चित केले आहे.
FSSAI राज्य परवाना शुल्क प्रति वर्ष INR 2000/- ते 5000/- पर्यंत आहे.
FSSAI केंद्रीय परवान्यासाठी शुल्क INR 7500/- प्रति वर्ष निश्चित केले आहे.
हेही वाचा : आयआयटी मंडीचे संशोधन: संत्र्याच्या सालीने शिजवता येणार अन्न
बेसिक FSSAI फूड लायसन्ससाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही नुकताच फूड बिझनेस सुरू करत असल्यास, FSSAI बेसिक फूड लायसन्स तुमच्यासाठी योग्य आहे.
फूड बिझनेस ऑपरेटर FSSAI नोंदणी फॉर्म भरून आणि सबमिट करून FSSAI नोंदणी मिळवू शकतात, म्हणजेच FosCoS पोर्टलवर फॉर्म A (नोंदणीसाठी अर्ज) किंवा फॉर्म B (राज्य आणि केंद्रीय परवान्यासाठी अर्ज) .
FSSAI नोंदणी फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना कागदपत्रे FoS CoS पोर्टलवर ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.
FSSAI नंतर सबमिट केलेल्या कागदपत्रांची छाननी करेल किंवा परिसराची तपासणी देखील करेल. त्या आधारावर, ते अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत नोंदणी स्वीकारतील किंवा नाकारतील.
मूलभूत FSSAI फूड लायसन्स मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- promoters(व्यवसायिकाचा) फोटो ओळख पुरावा
- व्यवसाय प्रमाणपत्र
- व्यवसायाच्या जागेचा ताबा असल्याचा पुरावा
- उत्पादित किंवा प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची यादी
- बँक खात्याची माहिती
Share your comments