कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२२-२३ चा ३३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला. शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी कारखान्याचे ज्येष्ठ सभासद कुबेर आबा पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी कारखान्याच्या संचालिका शारदा कुबेर पवार यांच्या हस्ते पूजा झाली.
माजी सहकार मंञी तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांचे शुभहस्ते व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये बॉयलर अग्नीप्रदीपन झाले. यावेळी शेतकरी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, या वर्षी गाळप हंगामामध्ये कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रामध्ये ३८ हजार एकर नोंदीचा व बिगरनोंदीचा ५ हजार एकर असा एकूण ४१ हजार एकर उस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे.
यामधून अंदाजे १६ ते १७ लाख टन ऊस गाळपाकरिता उपलब्ध होणार आहे. यंदाच्या हंगामात कर्मवीर शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यावर्षी कारखाना हा ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीचे शुभमुहूर्तावर चालू करण्याचे नियोजन केलेले आहे. कारखान्यातील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत.
लंम्पी रोग आता हायकोर्टात, राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली दाखल
मागील वर्षी कारखान्याने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ मध्ये एकूण २.७५ लाख टन गाळप केले होते. तसेच नियोजन यावर्षी कारखाना प्रत्येक महिन्यामध्ये करणार आहे. उसाचे क्षेत्र वाढले असले तरी त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच १.२० ते १.२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे.
तसेच मागील वर्षी २४५०/- रुपये प्रतिटन एफआरपी बसत असताना २५०० रुपये प्रतीटन भाव देण्याचे जाहिर केल्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर लवकरच ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेने थांबवली वाहतूक
भाजप नेत्याला मोठा धक्का! 28 वर्षांनंतर साखर कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीकडे
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो बोगस खते कशी ओळखायची? वाचा साधी सोप्पी पद्धत
Published on: 27 September 2022, 01:15 IST