पशुपालकांचा जवळजवळ 50 ते 60 टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होतो.त्यामुळे कमीत कमी खर्चात जनावरांना चांगल्या पद्धतीचे पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनावरांना वर्षभर चारा मिळावा म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने चाऱ्याची साठवण करू शकतोआणि जनावराची चाऱ्याची गरज भागवू शकतो.या लेखात आपण शेळ्यांच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापनत्याबद्दल माहिती घेणार आहोत.
शेळ्यांच्या आहारामध्ये मुख्यत्वेकरून झाडपाल्याचा उपयोग केला जातो. असा चारा वाढून सुद्धा दिला जातो त्यामुळे गोठ्याच्या आजूबाजूला अशा झाडांची लागवड करूनतुम्ही चाऱ्यावरील खर्च कमी करू शकतात. शेळ्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारा चारा वर्षभर उपलब्ध राहण्यासाठी चाऱ्याचे वर्षभरासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. फायदेशीर शेळीपालनासाठी वर्षभर शेळ्यांच्या आहारामध्ये हिरव्या आणि वाळलेल्या चाऱ्याचा समावेश असायला हवा.शेळीला तिच्या वजनाच्या चार ते पाच टक्के शुष्क पदार्थांची आवश्यकता असते.पशुखाद्याचा विचार केला तर त्याच्यात 90%,सुक्या चाऱ्यामध्ये 89 टक्के आणि हिरव्या चाऱ्यामध्ये 20 टक्के शुष्क पदार्थ असतात.
तसेच एकदल धान्य पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सात ते अकरा टक्के असते. तर एकूण पचनीय पोषकतत्वे 65 ते 70 टक्के असतात. त्याचप्रमाणे द्विदल धान्य पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 16 ते 20 टक्केआणि एकूण पचनीय पोषक तत्वांचे प्रमाण 60 ते 65 टक्के असते. जर आपण वाळलेल्या चाऱ्याचा विचार केला तर त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चार ते सहा टक्के असते आणि एकूण पचनीय पोषक तत्वांचे प्रमाण 50 ते 55 टक्के असते. एकदल चारा पिकांमध्ये मका, कडवळ, बाजरी, ज्वारी, दशरथ घास, गिनी गवत इत्यादींचा समावेश होतो. तसेच द्विदल चारा पिकांमध्ये लसूण घास, बरसीम, भुईमूग, चवळी, सोयाबीन इत्यादी चारा पिकांचा समावेश होतो. शेळ्यांमध्ये चाऱ्याचे योग्य रित्या पचन व्हावेत यासाठी आहारामध्येवाळलेला चारा,हिरवा चारा, खुराक आणि मिनरल मिक्स्चर असणे आवश्यक आहे.
शेळ्यांचे चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे करावे?
1) शेळ्यांना वर्षभर चारा मिळावा म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने चाऱ्याचे साठवणूक करू शकतो. त्यामुळे सुखा चारा वर्षभर साठवून ठेवावा अशा पद्धतीने साठवावा.सुक्या चाऱ्यावर अथवा भुसावर युरियाची प्रक्रिया करावी.
2) हायड्रोपोनिक चारा तयार करणे उत्तम असते.
3) अझोला तयार करणे.
4) मुरघास बनवून ठेवणे.
5) शेळ्यांसाठी घरच्या घरी पशुखाद्य तयार करणे.
6) शेळ्यांसाठी चारा म्हणून सुबाभूळ, शेवरी, अंजन वृक्ष इत्यादी झाडाची लागवड करू शकता. तसेच डी एच एन 6, गिनी गवत, पॅरा गवत, नेपियर, सुदाम गवत, दीनानाथ गवत, मारवेल इत्यादी चाऱ्याची लागवड करता येते.
7) तसेच शेतामध्ये आपण घेतो चे पीक घेतल्यानंतर उरलेला पालाशेळ्यांमध्ये चारा म्हणून वापरू शकता. फक्त यामध्ये जाड खोड असलेले पीक वापरणे टाळावे.
योग्य चारा नियोजन करून आपण शेळीपालनातील नफा चे प्रमाण वाढू शकतो.
Share your comments