सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे याचा अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. सर्वसामान्य लोक यामुळे नाराज असून त्यांनी सरकार विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना बहुतांश वाहनचालक सीएनजी इंधनाकडे वळत आहेत, त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र काही वेळा सीएनजी मिळवण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
आपण बघतो की, अनेक ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत. असे असताना आता याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऊर्जा वितरक स्टार्टअप 'द फ्युएल डिलिव्हरी' लवकरच मुंबईत सीएनजीची होम डिलिव्हरी सुरू करणार आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच आपण घरपोच सीएनजी ऑर्डर करू शकाल. या सेवेमुळे ज्या ग्राहकांच्या घरापासून सीएनजी स्टेशन लांब आहे, त्यांना याचा फायदा होणार आहे.
मुंबईत ही सेवा सुरू करण्यासाठी इंधन वितरणाने महानगर गॅस लिमिटेडसोबत एक करार केला आहे. करारानुसार शहरात सीएनजी स्टेशन उभारण्यात येणार आहेत. ग्राहकांना त्यांच्या दारात सीएनजी पुरविला जाईल. ही सेवा 24×7 आणि आठवड्याचे 7 दिवस उपलब्ध असेल. याद्वारे सीएनजीवर चालणाऱ्या ऑटो रिक्षा, कॅब, कार, खासगी आणि व्यावसायिक वाहने, स्कूल बससह इतर वाहनांची इंधनाची गरज भागवली जाईल. यामुळे सगळ्यांचेच टेन्शन मिटणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरु...
मोबाईल सीएनजी स्टेशन्सच्या मदतीने शहरभरात ग्राहकांच्या दारात इंधन पोहोचवले जाईल. ही सुविधा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी पंप खूप मर्यादित आहेत. यामुळे प्रवास करताना प्रवासाएवढाच सीएनजी भरण्यासाठी वेळ जात आहे. यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यामुळे आता होम डिलिव्हरी सुरू झाल्यानंतर ग्राहकांना यापुढे सीएनजीसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही.
PM Kisan योजनेत मोठा बदल, आता मिळणार ४ हजार रुपये, 'ही' कागदपत्रे जमा करावी लागणार
सध्या मुंबईत दोन मोबाईल सीएनजी स्टेशन चालवण्यास एमजीएल म्हणजे महानगर गॅस लिमिटेडकडून मान्यता मिळाली आहे. शभरात यशस्वीरित्या घरोघरी डिझेल पोहोचवल्यानंतर सीएनजीच्या घरोघरी वितरणाची घोषणा करून एक पाऊल पुढे टाकत आहोत. स्टार्टअप कंपनीने यापूर्वीच दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये डिझेलची होम डिलिव्हरी यशस्वीपणे केली आहे, असे स्टार्टअपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, रक्षित माथूर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आसाममध्ये पुराचा हाहाकार! 50 लाख लोक बाधित, मंत्री मात्र ठेवत आहेत बंडखोर आमदारांवर लक्ष
एकीकडे आमदार फरार मात्र हा आमदार थेट पेरणीच्या औतावर, फोटो व्हायरल
संधीवातावर गुणकारी ठरतो कोबी, असा करा वापर, संधीवात जाईल पळून
Published on: 29 June 2022, 11:36 IST