सध्या राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. सलग पाऊस पडत असल्याने शेत शिवारात पाणी तर साचून राहिलेच पण शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पावसानंतर किडींनीही शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य देणे गरजेचे आहे.(Government)
शिंदे-फडणवीसांचे सरकार हे शेतकरी विरोधी असूनसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
एनडीआरएफचे निकष पुढे करून तुटपुंजी मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न ईडी सरकारने केल्यास काँग्रेस त्याला जोरदार विरोध करेल तसेच पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सरकारकडून मिळणारी मदत अपुरी
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी जाहीर केलेली मदत ही अपुरी आहे. शिवाय सरकार एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर करत आहे असं सांगून नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. एनडीआरएफचे निकष जुने असून खतांच्या किंमतीही तिप्पट झाल्या आहेत. बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे.
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ड्रायव्हर..
या वाढत्या महागाईच्या तुलनेत राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत कमी आहे. यामध्ये केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. राज्य सरकारने कोरडवाहूसाठी हेक्टरी 75 हजार आणि बागायती, फळबागेसाठी 1 लाख 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.
शिंदे -फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. तसेच हे सरकार शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत असा आरोप पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर असताना, शेतकरी आत्महत्या होताच राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत होती मात्र आता शिंदे सरकराच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे तर मग गुन्हे कुणावर दाखल करावेत असा सवालही नाना पाटोळे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड
मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी सांगितले की…
Published on: 22 August 2022, 05:10 IST