रब्बी हंगाम २०२०-२१ वर्षासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. रब्बीतील गहू, (बागायत) ज्वारी (जिरायत) हरभरा व उन्हाळी भुईमूग ही पिके विमा योजनेंतर्गंत घेण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित पिकांकरीत व अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कुळासह कोणतेही शेतकरी सहभागी होऊ शकतात. वास्तवदर्शी विमा आकारणी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा आहे.
हेही वाचा : पीएम पीक विमा योजना : 'या' संस्था देतात विमा, जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील संस्था
सर्व पिकासाठी जोखीम स्तर हा ७० टक्के आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकांचा जोखीम स्तर विचारात घेऊ निश्चित केले जाणार आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यक,सर्व सुविधा केंद्र किंवा राष्ट्रीयकृत बँक, वित्तीय संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी स्वत: त्यांचे विमा प्रस्ताव ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर गहू व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर पूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. उन्हाळी भुईमुगासाठी ३० मार्च २०२१ पर्यंत मुदत आहे.
कसा असेल हप्ता आणि जोखीम स्तर
गहू (बागायती ) - जोखीमस्तर ७० टक्के , विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये, विमा हप्ता दर १.५० टक्के व विमा हप्ता दर ५७० रुपये हेक्टर याप्रमाणे राहिल.
ज्वारी (जिरायती) - जोखीमस्तर ७० टक्के , विमा संरक्षित रक्कम २८ हजार रुपये, विमा हप्ता दर १.५० टक्के व विमा हप्ता दर ४२० रुपये हेक्टर याप्रमाणे राहिल.
हरभरा - जोखीम स्तर - ७० टक्के, विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, विमा हप्ता दर १.५० टक्के व विमा हप्ता दर ५२५ रुपये हेक्टर याप्रमाणे राहिल.
भूईमूग - जोखीमस्तर ७० टक्के, विमा संरक्षित रक्कम ३० हजार ५००
रुपये, विमा हप्ता १.५० टक्के हप्ता दर ४७५.५० रुपये हेक्टर याप्रमाणे राहिल.
हेही वाचा : पंतप्रधान पीक विमा योजना : कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पीकांना मिळतो विमा
कसा कराल पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज ( PMFBY )
या योजनेच्या लाभासाठी तुम्ही बँकेतून अर्ज करु शकता परंतु बँकेत न जाता तुम्ही आता ऑनलाईनही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://pmfby.gov.in/.In या संकेतस्थळावर जावे लागेल.
पीएम पीक विमा योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आपल्याला काही कागदपत्रे द्यावी लागतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, चालक परवाना, मतदान कार्ड, आपला रहिवाशी पुरावा, यासह आपल्या पिकांची माहितीसाठी सरपंचाचे पत्र हवे. आपल्या जमिनीची माहिती सात बारा उतारा, जर आपण दुसऱ्याची जमीन कसत आहोत तर आपले करार पत्र दाखावे लागते. या सगळ्या कागदपत्रांसह एक बाद केलेला धनादेश द्यावा लागतो.
Share your comments