शेजारी शेजारी असणा-या साखर कारखान्यांचा एफ आर पी २९००₹ आणि ३१००₹ आहे. कारखाना १ =एफ आर पी (२९००₹) + शेअर्सची साखर + टनेजची साखर
शेअर्सची साखर = कारखान्याला ऊस घालणा-या शेतक-याला प्रतिवर्षी १०० किलो साखर मिळते. बाजारात ३६₹ असणारी साखर ८₹ या दराने मिळाल्याने शेतक-याची २८₹ प्रतिकिलो बचत होते.म्हणजेच १०० किलोसाठी ही रक्कम २८००₹ होते.
टनेजची साखर = शेतक-याच्या ऊसाला प्रत्येक टनामागे ५०० ग्रँ साखर मिळते. बाजारात ३६₹ प्रति किलो असणारी साखर इथे १५₹ प्रतिकिलो या दराने मिळत असल्याने शेतक-याचे २१₹ प्रतिकिलो बचत होते.म्हणजेच ऊसाला १०.५₹ प्रतिटन एवढा अप्रत्यक्ष फायदा होतो.
कारखाना २ =एफ आर पी (३१००₹) + टनेज साखर ( ८₹ प्रतिटन)
कारखाना २: बाजारात ३६₹ असणारी साखर २०₹ दराने शेतक-यांना टनेज साखर स्वरुपात दिली जाते म्हणजेच शेतक-यांची १६ ₹ प्रतिकिलो बचत होते व टनामागे अर्धा किलो याप्रमाणे ८₹ प्रतिटन शेतक-यांना अप्रत्यक्षपणे वाढतात.
शेतकऱ्यांनो गाय, म्हैस आणि शेळी खरेदी विक्रीसाठी अॅप, सर्व कामे होतील एका क्लिकवर
शेतक-याच्या एक एकर शेतातून सरासरी ६० टन ऊस उत्पादित होतो. ६० टन ऊसासाठी दोन्ही कारखान्याकडून किती फायदा मिळेल ?
कारखाना १ = २९००₹×६०टन + १०.५₹×६० टन + २८००₹
= १,७४,०००₹ + ६३०₹ +२८००₹
= १,७७,४३०₹
कारखाना २ = ३१००₹ × ६० टन + ८₹ × ६० टन = १,८६,४८० ₹
राजू शेट्टींनी इशारा देताच छत्रपती कारखान्याचे गाळप बंद, FRP पेक्षा 200 जास्तच घेणार...
म्हणजेच २९००₹ देणा-या कारखान्याला ६० टन ऊस घातल्यानंतर ९०५०₹ तोटा होऊ शकतो.
दिलेल्या तक्त्यावरुन लक्षात येतं जर १५ टनापेक्षा कमी ऊस असेल तरच २९००₹ देणा-या कारखान्याला ऊस देऊन फायदा होऊ शकतो. असा हिशोब राजू शेट्टी यांनी सांगितला.
महत्वाच्या बातम्या;
राजू शेट्टींनी रस्ता केला आणि 2 कॅन दुधाचे झाले 16 कॅन दूध, गावकऱ्यांच्या वैभवात पडणार भर
ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा, कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय
आता बिअर कडू लागणार नाही, येणार स्वादिष्ट बिअर...
Share your comments