गोड ज्वारीच्या पिकापासून ज्वारी हे धान्य, गुरांसाठी चारा आणि त्याबरोबर काही प्रमाणात इथेनॉल बनवण्याचा आपण भविष्यात विचार केला तर इंधनाच्या निर्मिती बरोबर अन्नसुरक्षा व चारा टंचाईचा प्रश्न सुटेल व प्रदूषणाच्या समस्यावर सुद्धा आपल्याला मात करता येईल.
दिवसेंदिवस दिवस खनिज तेलाच्या किमती भारतातील नागरिकांना परवडणाऱ्या नाहीत, अशा पातळीवर पोहोचत आहेत त्यामुळे जैव इंधनाच्या पर्याय शोधण्याची गरज आहे. आपण ऐवजी तीन जणांचा पुरेशा प्रमाणात आणि स्वस्त दरात पुरवठा करणारा पर्याय शोधण्यात यशस्वी ठरलो तर असे स्वस्तात उपलब्ध होणारे द्रव्य महागड्या पेट्रोलमध्ये मिसळून इंधनाची दरवाढ नियंत्रणात आणता येईल. तसेच खनिज तेलाच्या आयात करण्यासाठी जे परकीय चलन खर्च होते त्यात लक्षणीय प्रमाणात कपात होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही चांगली उत्पन्न देणारा उत्पादक रोजगार मिळेल. अशा रीतीने समाजातील जवळपास सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणारे गोड ज्वारीपासून इथेनॉल तयार करणे होय व गोड ज्वारीचे क्षेत्र वाढवणे.
राज्यातील हवामान, उपलब्ध जमीन व पडणारा पाऊस लक्षात घेता आणि गोड ज्वारी सारखे कमी पावसामध्ये आणि पावसाचा ताण सहन करणारे पीक आपल्याला घेता येऊ शकते. पावसाचा अनियमितपणा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसक्षेत्र कमी होत आहे. सततच्या वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जागतिक स्तरावरील इंधन समस्येमुळे होणारे प्रदूषण, तसेच तेलसाठा वरती होणारा परिणाम लक्षात घेता उसाबरोबर इतर पिकांपासून तसेच गोड ज्वारीपासून इंधन मिळवणे जरुरीचे आहे. गोड ज्वारीचे बायोमास उत्पादन क्षमता उसापेक्षा अधिक आहे.
त्यामुळे खरीप हंगामात गोड ज्वारीचे उत्पादन आपण घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे पेट्रोल मध्ये आपण पाच ते दहा टक्के इथेनॉलचा वापर करू शकतो. त्यामुळे गोड ज्वारी सारखे पीक शाश्वत इंधनासाठी वापरण्यास आपल्याला वाव आहे. खरीप आणि उन्हाळीहंगामामध्ये गोड ज्वारीच्या ताटाचे उत्पादन 40 ते 45 टन प्रति हेक्टर एवढे मिळते. या ताटापासून चरख्याने रस काढला असता 12 ते 15 हजार लिटर रस प्रति हेक्टरी मिळू शकतो. त्यालाआंबवण्याची प्रक्रिया करून आपण इथेनॉल तयार करू शकतो. गोड ज्वारीच्या रसामध्ये 10 ते 12 टक्के साखर असते. त्यामुळे ती आंब विण्याच्या प्रक्रियेस योग्य असते. त्यामुळे त्यापासून साधारण सहा ते सात टक्के इथेनॉलची रिकव्हरी मिळते. म्हणजेच आपणास एक हजार ते बाराशे लिटर इथेनॉल उत्पादन प्रति हेक्टरी मिळू शकते. सरकारी किमती नुसार गोड ज्वारीचे ज्वारीपासून चार महिन्यात 36 हजार ते 44 हजार रुपये प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.
गोड ज्वारीपासून इथेनॉल बनवण्यासाठी महाराष्ट्रात सध्या तरी नव्याने भांडवली गुंतवणूक करण्याची गरज नाही. सध्या राज्यात बंद पडलेल्या साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीचा वापर करून इथेनॉल निर्मिती करणे शक्य होऊ शकते. गोड ज्वारीच्या ताटातील रस काढून उरणारा चोथा हा गुरांसाठी दर्जेदार चारा म्हणून वापरता येईल. त्यामुळे राज्यातील टंचाईची समस्या निकालात निघेल आणि दुग्धोत्पादन व्यवसायाला चालना मिळेल.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी उसा शिवाय दुसरे लाभदायक पीक अस्तित्वात नाही अशी काल पर्यंतचे स्थिती होती. आज की उसाची शेती ही लाभदायक राहिलेली नाही. या समस्येवर एक रामबाण उपाय आपण गोड गोड ज्वारीच्या पिकाचा आणि त्यापासून इथेनॉल बनविण्याच्या उद्योगाचा विचार करायला हवा. या पिकामध्ये आणि त्यापासून इथेनॉल बनवण्याच्या उद्योगांमध्ये राज्याच्या ग्रामीण भागाचाकायापालट करण्याची क्षमता निश्चितपणे आहे..
Share your comments