सध्या पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. असे असताना आता राजस्थानमधील एका पेट्रोलपंपाच्या मालकाने एक भन्नाट ऑफर दिली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
ही ऑफर म्हणजे, दुधाच्या रिकाम्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल्स द्या आणि पेट्रोल-डिझेलवर सूट मिळवा अशा आशयाचे फलक परिसरात लावण्यात आले आहे. केवळ एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बॉटल्स देऊन इंधनावर सूट मिळणार आहे. पेट्रोलवर १ रूपया तर डिझेलवर ५० पैसे सूट दिली जाईल असे सांगितले जात आहे. यामुळे अनेक नागरिक याचा लाभ घेत आहेत.
अखेर उद्या डिसले गुरुजी अमेरिकेत जाणार! अनेक घडामोडींमधून निघाला मार्ग..
या ऑफरअंतर्गत १ लीटर पेट्रोलवर १ रूपया तर १ लीटर डिझेलवर ५० पैसे सूट मिळेल. यासाठी सारस डेअरी उघडण्यात आली आहे, गोळा केलेल्या सर्व पिशव्या आणि बॉटल्स सारस डेअरीला दिल्या जातात. तिथे या प्लास्टिकची विल्हेवाट लावली जाते. यामुळे प्रदूषण कमी होणार असून त्या कोठेही रस्त्यावर दिसणार नाहीत.
सातबारा वरील जातीवाचक नावे हद्दपार! ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
याचा फायदा देखील दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण ७०० हून अधिक बॉटल्स जमा झाल्या आहेत. एका महिन्यात १० हजार प्लास्टिकच्या वस्तू गोळा होतील असा आमचा अंदाज होता मात्र पावसामुळे पंपावर लोकांची ये-जा कमी आहे, अशी माहिती पेट्रोल पंपाचे मालक अशोक कुमार मुंद्रा यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या;
शिवप्रभुंचा स्वाभिमान उफाळुन आला तो आग्रा पहिल्या रांगेत, आणि शिंदे साहेब शेवटी, साहेब वाईट वाटल..
महादेव जानकर भाजपची साथ सोडणार? जानकर म्हणाले...
दूध दरात एक रुपयाची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Published on: 08 August 2022, 02:57 IST