News

योगी सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे, राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सकाळी 11 वाजता विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. त्यातच हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खास ठरला आहे. भाजप सरकारने आपल्या जाहीरनाम्यात या गोष्टींचा समावेश केला होता.

Updated on 26 May, 2022 5:47 PM IST

योगी सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे, राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सकाळी 11 वाजता विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. त्यातच हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खास ठरला आहे. भाजप सरकारने आपल्या जाहीरनाम्यात या गोष्टींचा समावेश केला होता. अर्थसंकल्पाच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर, अंदाजपत्रक 6.10 लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट असेल.

अर्थसंकल्पापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आणि म्हणाले, "उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित लोक-कल्याणकारी अर्थसंकल्प आज सभागृहात सादर केला जाईल. आदरणीय पंतप्रधानांच्या प्रेरणेने, डबल इंजिनचे भाजप सरकार उत्तर प्रदेशला देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.

यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने 'लोक कल्याण संकल्प पत्र' जारी केले होते, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक घोषणांचा समावेश करण्यात आला होता. आता या अर्थसंकल्पात योगी सरकार या घोषणा अमलात आणेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना वीजबिलात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत

याशिवाय मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य 15 हजारांवरून 25 हजारांपर्यंत, सार्वजनिक वाहतूक (बस) मध्ये 60 वर्षांवरील महिलांना मोफत प्रवास सुविधा, विधवा आणि निराधार महिलांच्या पेन्शनमध्ये वाढ, गुणवंत विद्यार्थिनींना देण्यात आली आहे. राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत मोफत स्कूटी वाटप आदी ठरावांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्याबाबतही चर्चा आहे.

जगातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, प्रत्येकाच्या खात्यावर आहेत १५ लाख रुपये, वाचा श्रीमंतीचे कारण...

सुमारे 10 लाख कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात सुमारे 1.25 लाख कोटी रुपये (कॅपिटल आयटम) विकास कामे आणि नवीन योजनांसाठी असतील. तसेच १५ हजार कुपनलिका बसवण्यात येणार आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. यामुळे येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशमध्ये मोठा विकास होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठलय? युरियाचे पाणी टाकल्याने चाळीतील कांदा नासला
शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना! डिझेलचे भाव कमी, मात्र नांगरटीचे दर वाढवले..
साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

English Summary: Electricity bill waiver farmers !! announcement Yogi government budget ..
Published on: 26 May 2022, 05:47 IST