1. बातम्या

कमी जागेत करा हा जोडधंदा आणि अधिक नफा कमवा

मशरूम शेती हा एक फायदेशीर व्यवसाय मानला जातो जर तुम्ही शेतीद्वारे चांगला व्यवसाय करून चांगली कमाई करण्याचा विचार करत असाल तर मशरूम शेती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बाजारात मशरूमला मोठी मागणी आहे कारण त्यात प्रोटीन, फायबर आणि अमीनो ऍसिड असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.मशरूम शेती ही कमी जागेत, कमी भांडवलात आणि अगदी घरातही सहज करता येते. अलीकडे भारतातील काही राज्यांमध्ये मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
mushroom farming

mushroom farming

मशरूम शेती हा एक फायदेशीर व्यवसाय मानला जातो जर तुम्ही शेतीद्वारे चांगला व्यवसाय करून चांगली कमाई करण्याचा विचार करत असाल तर मशरूम शेती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बाजारात मशरूमला मोठी मागणी आहे कारण त्यात प्रोटीन, फायबर आणि अमीनो ऍसिड असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.मशरूम शेती ही कमी जागेत, कमी भांडवलात आणि अगदी घरातही सहज करता येते. अलीकडे भारतातील काही राज्यांमध्ये मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

मशरूम लागवडीसाठी जागेची निवड -
मशरूमची लागवडीसाठी हवेशीर जागा असावी. कमीतकमी 250 ते 300 स्क्वेअर फूट जागेतही
मशरूमची लागवड करता येते. जिथे सूर्यप्रकाश येत नाही अशी जागा निवडा. कारण सूर्याची किरणे थेट मशरूम वर पडल्यास मशरूम खराब होऊ शकतात.

मशरूमची लागवड तीन प्रकारे करता येते –
मशरूम वाढवण्यासाठी, बांबूचा पलंग बनवला जातो आणि त्यावर मशरूम ठेवल्या जातात.
मशरूमला हवेत लटकवून, या पद्धतीत तुम्ही मशरूमच्या बिया प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून लटकवता, याला कमी जागा लागते आणि कमी जागेत जास्त मशरूम पिकवता येतात.

भारतात उगवले जाणारे मशरूम - 
व्हाईट बटन मशरूम, धिंगरी मशरूम, मिल्की मशरूम, पॅडी स्ट्रॉ मशरूम, शिताके मशरूम

कंपोस्ट तयार करणे -
मशरूमच्या लागवडीमध्ये कंपोस्ट खताची महत्त्वाची भूमिका आहे. गव्हाच्या पेंढ्याद्वारे कंपोस्ट खत बनवू येते.यासाठी त्यात 1.5 किलोग्राम फॉर्मेलिन मिसळून त्यात 150 ग्रॅम बेवेस्टीन टाकावे.त्यानंतर हे मिश्रण काही वेळ झाकून ठेवावे.

मशरूमची पेरणी -
पाण्यात भिजवलेले पेंढा बाहेर काढून हवेत पसरवावे, जेणेकरून त्यातील पाणी आणि ओलावा सुकून जाईल. पेरणीसाठी तुम्हाला पॉलिथिनच्या पिशव्या घ्याव्या लागतील, ज्याचा आकार 16 बाय 18 असावा.
सर्वप्रथम या पॉलिथिन पिशव्यांमध्ये पेंढा टाका, नंतर या थराच्या वर मशरूमचे दाणे शिंपडा.या पॉलिथिन पिशवीमध्ये दोन्ही कोपऱ्यांवर छिद्रे पाडणे आवश्यक आहे, जेणेकरून पेंढ्याचे अतिरिक्त पाणी इत्यादी काढून टाकता येईल.मशरूमच्या उत्पादनासाठी वातावरण हे अंधकारमय असणे गरजेचे आहे. हवेतील आद्रता 70 ते 80% व तापमान 18 ते 28°c असावे. चांगल्या उत्पादनाकरिता खेळते हवा असणे खूप महत्त्वाचे आहे.

मशरूम काढणी -
मशरूम पिकाचा कालावधी बघितला तर मशरूमचे पीक ५० ते ६० दिवसात तयार होते, जेव्हा मशरूम 5 ते 7 सेंटीमीटर झाल्यावर त्याला तोडावे लागते. तयार मशरूम पीपी बॅग मध्ये ठेवावे. यासाठी प्रति किलो 20 ते 25 रुपये खर्च येत असतो. परंतु त्याची विक्रीही 200 ते 400 किलो प्रति दराने होते. अशा प्रकारे शेतकरी मशरूम च्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

English Summary: Do this business in less space and earn more profit Published on: 29 October 2023, 06:33 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters