गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर कसलीही दयामाया न दाखवता अनेकदा भरमसाठ बिल आकारले जात आहे. यामुळे शेतकरी आधीच हतबल झाले आहेत. आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वीजबील कंपनीकडून एक अजब घटना घडली आहे. याची सध्या चर्चा सुरू आहे.
येथील प्रियंका गुप्ता यांना तब्बल 3, 419 कोटी रुपयांचे वीज बिल आले आहे. यामुळे त्यांना धक्काच बसला आहे. ही किंमत ऐकल्याने त्यांचे सासरे आजारी पडले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे. त्यानंतर योग्य चौकशी करून गुप्ता कुटुंबाला १३०० रुपयांचे बिल देत दिलासा दिला आहे.
वीज बिल कंपनींच्या या प्रकारामुळे मात्र नागरिक संतापले आहेत. वीज कंपनींच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या जीव जाऊ शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत. त्यांना ठराविक रकमेचे येणारे बिल हे कोटींमध्ये आल्याने अचानक धक्का बसला. यामुळे वडील आजारी पडल्याचे त्यांनी सांगितले.
भारीच की! शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा शेती आणि 3 महिन्यात लखपती व्हा, जाणून घ्या..
यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेत वीज बिलातील झालेली त्रुटी सुधारण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती खासदार उर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! खोदलेली विहीर गेली चोरीला, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार...
राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, शिंदे सरकारची मोठी घोषणा
'नंदी ब्लोअर' ची कमाल, आता ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा..
Published on: 27 July 2022, 12:08 IST