1. बातम्या

अमरावती जिल्हा बनणार का स्ट्रॉबेरीचे आगार? जिल्ह्यात विक्रमी स्ट्रॉबेरी लागवड

देशात पीक पद्धतीत आता मोठा बदल घडताना दिसत आहे. पारंपारिक पीक पद्धतीला शेतकरी बांधव आता बगल देतांना बघायला मिळत आहेत, पारंपारिक पीक पद्धती मध्ये उत्पादन खर्च अधिक आणि पदरी पडणार हे उत्पन्न हे कवडीमोल असल्याने शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत नवीन नगदी पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अमरावती मध्ये देखील शेतकरी बांधवांनी असाच काहीसा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. अमरावती जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड बघायला मिळत आहे. जिल्ह्यात सध्या स्ट्राबेरीचे क्षेत्र वाढत असल्याने हा राज्यात सर्वत्र मोठा चर्चेचा विषय बनला आहे. स्ट्रॉबेरी हे थंड हवामानात येणारे फळपीक आहे. मिरची लागवड महाराष्ट्रातील महाबळेश्वर सारख्या थंड प्रदेशात केल्यास दर्जेदार उत्पादन मिळते असा तज्ज्ञांचा दावा आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
strawberry farming

मात्र शेतकरी हा एक ब्रान्ड आहे सर्वे दावे हे केवळ कागदावरती असतात मात्र बळीराजा अहोरात्र काळ्या आईच्या सेवा करतो आणि जे अशक्य आहे त्याला शक्य करून दाखवतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील असाच प्रयोग शेतकऱ्यांनी सक्सेस करून दाखवला आहे. खरं पाहता स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक आहे आणि विदर्भातील तापमान हे अतिशय उष्ण आहे, मात्र शेतकरी ठरवतो ते करतोच याच पद्धतीने शेतकऱ्यांनी ठरवलं की टॉबेरी लागवड विदर्भात करून दाखवायची, त्या अनुषंगाने विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कंबर कसली आणि स्ट्रॉबेरी लागवड केली आणि त्यातूनही दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादित केली जात आहे, त्यामुळे अनेक तज्ञ असे सांगत आहेत की, चिखलदरा स्ट्रॉबेरी मध्ये ब्रँड बनू शकतो तसेच संपूर्ण अमरावती जिल्हा स्ट्रॉबेरी आगार म्हणून देखील ओळखला जाऊ शकतो. तीन महिन्याचे कठीण परिश्रम घेऊन, कष्टाची पराकाष्टा करून चिखलदऱ्याच्या भूमिपुत्रांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एक आगळावेगळा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यामुळे चिखलदऱ्याच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जातं आहे.

विदर्भातील नंदनवन गाव हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे येणारे पर्यटक चिखलदऱ्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. पर्यटक चढ्या दराने येथे येऊन स्ट्रॉबेरी खरेदी करतात. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी स्ट्रॉबेरीचे भाव चढे असतात असे असले तरी स्ट्रॉबेरीज ची क्वालिटी चांगली असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने याची खरेदी करताना बघायला मिळतात. स्थानिक बाजारात स्ट्रॉबेरी 60-70 रुपये प्रति पावकिलो तर 280 रुपये किलो या दराने विकली जात आहे. चिखलदरा शहरात येणारे पर्यटक मोठ्या संख्यने चिखलदरा शहरातील स्टॉलमधून स्ट्रॉबेरी खरेदी करतांना नजरेस पडतात. 

स्ट्रॉबेरीचे जास्त उत्पादन झाल्यावर अमरावतीच्या चिखलदऱ्याहून थेट नागपूरला पाठवले जाते. चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे तसेच शेतमजूर देखील यामुळे सुखावले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीच्या बागा झाल्यामुळे शेतमजुरांना हाताला काम मिळाले. चिखलदऱ्यात उत्पादित केली जाणारी स्ट्रॉबेरी स्थानिक पातळीवर विकली जाते मात्र असे जरी नाही झाले तरी नागपूरच्या बाजारपेठेत स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते त्यामुळे नागपूरची बाजारपेठ चिखलदऱ्याचा स्ट्रॉबेरी साठी आधार आहे.

English Summary: chikhaldara strawberry is becoming big brand Published on: 11 February 2022, 09:03 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters