1. बातम्या

गोष्ट छोटी पण परिणाम मोठा! या बाजार समितीचा निर्णय आहे छोटा परंतु शेतकऱ्यांसाठी आहे खूप महत्त्वाचा, वाचा सविस्तर

कधीकधी प्रत्येकच गोष्टीत असे होते की बर्याच समस्या दिसतात. परंतु जर एखादा छोटासा निर्णय या समस्यांवर उपाय म्हणून केला तर तो फारच परिणामकारक ठरताना दिसतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
weight scale fee excuse in chalisgaon market comitee

weight scale fee excuse in chalisgaon market comitee

कधीकधी प्रत्येकच गोष्टीत असे होते की बर्‍याच समस्या दिसतात. परंतु जर एखादा छोटासा निर्णय या समस्यांवर उपाय म्हणून केला तर तो फारच परिणामकारक ठरताना दिसतो.

अशा छोट्याशा निर्णयाने एकच नाहीतर बऱ्याच गोष्टींवर सकारात्मक परिणाम होतो. हीच पद्धत जर शेतकऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर लागू केली तर तिचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात. एक छोटासा निर्णय एका बाजार समितीने घेतला परंतु तो निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरेल असे दिसते. मग बाजार समिती असो कि व्यापारी शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार ते घडत असतात. परंतु बाजार समितीचा हा निर्णय शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल असा आहे.

नक्की वाचा:बैलगाडा शर्यती मधले खटले मागे; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

 चाळीसगाव बाजार समितीचा हा आहे महत्त्वपूर्ण निर्णय                  

 चाळीसगाव बाजार समितीने एक असा निर्णय घेतला की तो शेतकऱ्यांचा हिताचे ठरणार आहे. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांचा शेतीमाल मोजण्यासाठी भुईकाट्यावरील फि माफ करण्याचा निर्णय या बाजार समितीने घेतला आहे आणि एवढेच नाही तर गुढीपाडव्यापासून या निर्णयाची  अंमलबजावणी देखील केली जाणार आहे.

ऐकायला हा निर्णय छोटा असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असून या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होण्याचा प्रकार थांबवू शकतो.बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

 या निर्णयाचा बाजार समिती वरील परिणाम

 ही बाजार समिती केंद्रस्थानी असल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात आवक होत असते. शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनाचे आणि मालाचे वजन केले जाते. आपल्याला माहित आहेच की शेतकऱ्यांना किमान पन्नास रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम यासाठी द्यावी लागते. परंतु या निर्णयाने बाजार समितीला मात्र मिळणारे उत्पन्न बंद होणार असून याची जबाबदारी आता बाजार समितीने घेतली आहे.

नक्की वाचा:कृषी वीज पुरवठा: शेतीला 24 तास वीजपुरवठा करा- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी

यामध्ये बाजार समितीचे जवळजवळ सहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्नात घट होणार आहे. यामुळे सहालाखांचे उत्पन्न घटनार असून प्रशासन मधील सर्वांच्या मंजुरी नंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. जर आपण चाळीसगाव बाजार समितीचा विचार केला तर विविध उपक्रम राबवण्या मध्ये  ही बाजार समिती अग्रस्थानी असते. 

यापूर्वी या बाजार समितीने माझी बाजार समिती हे मोबाईल ऍप सुरू केले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमालाची आवक, बाजारपेठेतील मालाचे भाव, बाजारपेठेमध्ये कोणत्या मालाची आवक जास्त झाली याची सर्व माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मालाची साठवणूक करायची कि विक्री याबद्दलचा निर्णय घेणे सोपे होते.

English Summary: chalisgaon market commite take decision to shut taking fee to weight scale Published on: 01 April 2022, 08:57 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters