कापूस म्हटले तर अख्ख्या महाराष्ट्रातकापसाला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश च्या बऱ्याच भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु मागील काही वर्षांपासून कापसावर बोंड आळी आणि बोंड सड यामुळे विपरीत परिणाम झाला आहे. जर विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भ मध्ये धान पिकावर देखील बोंड आळी आणि खोडकिडा मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होते. या नुकसान यावर तोडगा म्हणून ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटकांपासून अळ्या आणि खोड किडी यांची अंडी नष्ट करण्याचा प्रयोग परिणामकारक ठरू लागला आहे.
टायक्रोग्रामा ह्या परोपजीवी कीटक अंडी वर्गिया कीटकांची अंडी नष्ट करतो. हा परोपजीवी कीटक शेतात फिरून बोंड आळी चे अंडे शोधून काढून ते नष्ट करतो व तेथे स्वतःची अंडी टाकतो. त्यामुळे नुकसान कारक किड्यांची म्हणजेच बोंड आळी ची किंवा तत्सम कीटकांची नवीन अवस्था तयार होत नाही. त्यामुळे अशा कीटकांना मारण्यासाठी फवारणी करण्याचा प्रश्नच येत नाही. असे या प्रयोगाचे प्रशिक्षण देणारे केंद्र एकात्मिक कीड व्यवस्थापन विभागाचेतांत्रिक अधिकारी प्रल्हाद कोल्हे यांनी सांगितले.
हा प्रयोग नागपूर जिल्ह्यात राबवण्यासाठी नागपूर चे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
विदर्भाचा विचार केला तरविदर्भात धान आणि कापूस हे प्रमुख पिके आहेत.या दोनही पिकांवर बोंड आळी आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव मुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी शेतकऱ्यांनाया किडींचा नायनाट करण्यासाठी फवारणीवर अतोनात खर्च करावा लागतो.तरीही फायदा होत नाही.ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकाच्या वापराने या कीटकांची अंडी नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरते.
त्यामुळे या कीटकांचे अवस्था पूर्ण न होताच नष्ट होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हा प्रयोग वनामती मध्ये असताना देखील राबविला होता. त्यांनी अमरावतीत असतानाही हा प्रयोग तेथेही राबवला होता. त्याचाचांगला फायदा शेतकऱ्यांना झाला होतायावर्षी नागपूर जिल्ह्यातया उपक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे.
Share your comments