News

केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असतात. यामध्ये पीएम गरीब कल्याण अन्न योजनेचा समावेश होतो. आता मात्र यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकाधारकांना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे.

Updated on 25 May, 2022 3:33 PM IST

केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असतात. यामध्ये पीएम गरीब कल्याण अन्न योजनेचा समावेश होतो. आता मात्र यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकाधारकांना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे.

यामुळे तुम्हाला आता जूनपासून तुम्हाला गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल. केंद्र सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले जाते. केंद्र सरकारने गव्हाचा कोटा कमी केला आहे. यामुळे यामध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे आता यूपी, बिहार आणि केरळमध्ये गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही.

यामुळे आता अनेकांची अडचण होणार आहे. तसेच महाराष्ट्रात गव्हाचा कोटा कमी करण्यात येणार आहे. तसेच दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी येणार आहे. तसेच सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदळाचे अतिरिक्त वाटप करण्यात येणार असल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले.

ऊसतोड मजुरांचा सत्कार करून 3 एकर उसाला लावली काडी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

हा बदल फक्त PMGKAY साठी आहे. यामुळे काही राज्यांमध्ये गहू कमी होऊन पूर्वीपेक्षा जास्त तांदूळ दिला जाईल. यूपी-बिहारमधील गव्हाचे वाटप संपुष्टात येण्याचे कारण गव्हाची कमी खरेदी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हा बदल सगळ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या;
अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वाट बघणार, अतिरिक्त उसाबाबत वासुदेव काळे आक्रमक
Banana : काय सांगता! 13 इंच लांब केळी, केळी बघून कृषीतज्ञही झाले अवाक..
म्हैस खरेदीवर सरकार शेतकऱ्यांना देणार ५०% अनुदान, जाणून घ्या

English Summary: Big change in rationing process, big shock to common people
Published on: 25 May 2022, 03:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)