पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारखाने देखील आहेत. यामध्ये सहकारी आणि खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. यामध्ये पवार कुटूंबाच्या ताब्यात देखील काही कारखाने आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना एका कारखान्याच्या प्रकरणात मोठा दणका बसला आहे.
याबाबत करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला भाडेतत्वातर देण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. ऋण वसुली संचालनालयच्याकडून पवार यांना हा दणका बसल्याचे मानले जात आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना पवार यांच्या बारामती ऍग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र ऋण वसुली संचालनालयाकडून पुढच्या सुनावणीपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे.
अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच
याबाबत संचालक मंडळाच्या ठरावानुसार कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर दोन वर्ष झाले तरी कारखाना सुरू झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे संचालक मंडळ देखील चिंतेत आहे.
याबाबत एका समितीने हा कारखाना भाडेतत्त्वावर देऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती. हा कारखाना हा सहकारी तत्त्वावरच चालवला गेला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. यामुळे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याभागात कारखाने हा राजकारणाचा पाया मानला जातो, यामुळे रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या;
ऊस, कांदा उत्पादकांच्या व्यथांचा भोंगा कोण वाजवणार! तुम्हाला फक्त मतदानाला विचारणार
महादेव जानकरांनी थेट गाईच्या धारा पिळत मांडले दुग्ध व्यवसायातील आर्थिक गणित, वाचा...
पेट्रोल- डिझेल स्वस्त, फायदा थेट शेतकऱ्यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारले एका दगडात दोन पक्षी
Published on: 23 May 2022, 03:10 IST