News

बारामतीमध्ये शेतीचे अनेक वेगवेगळे प्रयोग केलं जातात. आता अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अटल इंक्युबेशन सेंटरने नुकताच जोहान्सबर्ग बिझनेस स्कूल, दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत मायक्रोसोफ्ट व ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व शिक्षक यांच्या देवाणघेवाणीसाठी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार केला.

Updated on 08 May, 2023 10:34 AM IST

बारामतीमध्ये शेतीचे अनेक वेगवेगळे प्रयोग केलं जातात. आता अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अटल इंक्युबेशन सेंटरने नुकताच जोहान्सबर्ग बिझनेस स्कूल, दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत मायक्रोसोफ्ट व ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व शिक्षक यांच्या देवाणघेवाणीसाठी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार केला.

यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग बिझनेस स्कूलचे डीन डॉ. रँडल कॅरोलिसन,पीएचडी विद्यार्थ्यांना युवा उद्योजकत्वासाठी नेतृत्व प्रशिक्षण देणार्‍या मान्यताप्राप्त प्रशिक्षक श्रीमती नादिया बॉसमन कॅरोलिसन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. अजित जावकर उपस्थित होते. नेदरलँडच्या वाखनिंगन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ फिलीप वॅन नूर्ट,युतोंग किउ आणि क्षिती मिश्रा तसेच हॉलंडोर या कंपनीचे संचालक निक बोट्डेन यांनीही संस्थेच्या संशोधन उपक्रमांना यादिवशी भेट दिली.

या सामंजस्य करारामुळे जोहान्सबर्ग बिझनेस स्कूल, दक्षिण आफ्रिका येथे उभारण्यात येणार्‍या सेंटर ऑफ एक्सलेन्सला आता #ADTच्या इंक्युबेशन सेंटरमधून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आपल्याकडील विद्यार्थी व स्टाफ यांना दक्षिण आफ्रिकेतील सेंटर ऑफ एक्सलेन्स आणि संशोधनाचा भाग होण्याची संधी मिळणार आहे.

पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत

त्यामुळे संस्थेचा मूळ हेतु असलेल्या संशोधक निर्माण करण्याला चालना मिळणार आहे. हे कोणाही एकट्याचे यश नसून संस्थेच्या व्यवस्थापनासह संस्थेच्या सर्व टीमचे यश आहे.संस्था संशोधन व विकास क्षेत्रात सातत्याने नवनवीन उप्रकम राबवित असते त्यामुळे हे यश म्हणजे संस्थेच्या सांघिक प्रयत्नाचे प्रतिकच आहे.

ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला नवीन कोरोना अत्यंत गंभीर, मोठी माहिती आली समोर

असे अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक बदल आपल्याला बघायला मिळणार आहेत. तसेच याचा शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

आता धेनू अ‍ॅपमधील डिजिमार्ट देणार व्यावसायिकांना लाखों रुपये कमावण्याची संधी...
मी जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी..
भात शेतीसोबत मत्स्यपालन करा, चांगले उत्पन्न मिळून दुप्पट उत्पन्न मिळेल

English Summary: Baramati Agricultural Development Trust MoU on Research in Artificial Intelligence
Published on: 08 May 2023, 10:34 IST