आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आपल्या आईवडिलांनी शेतात कष्ट करून शिक्षणासाठी हव्या त्या गोष्टी मिळवून दिल्या. आज त्यांच्या या कष्टामुळे आपण चांगल्या पदावर आहोत या भावनेने एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या वडिलांना एक अनोखे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे कोपरगाव परिसरातील या शेतकरी कुटुंबाची राज्यात बरीच चर्चा होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द या गावात राहणारे पुंगळ कुटुंब यांची पोटापुरती जेमतेम शेती आहे. तरीसुद्धा आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी यमाजी बाबुराव पुंगळ आणि त्यांच्या सौभाग्यवती अनुसया यमाजी पुंगळ यांनी आपल्या शेतात दिवस रात्र काबाडकष्ट घेतले. त्यांच्या या कष्टाची जाणीव त्यांच्या मुलाने ठेवली. त्याने आपल्या आई-वडिलांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी एमजी हेक्टर कार भेट दिली.
यमाजी पुंगळ दाम्पत्यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा बाबासाहेब यमाजी पुंगळ याचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे येथे झाले. दहावीत चांगले मार्क्स मिळाल्यामुळे त्यास शिष्यवृत्ती मिळाली आणि पुण्यातील इंजीनियरिंग गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक व एमआयटी पुणे येथे मोफत प्रवेशही मिळाला.
घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्यांनी कमवा व शिका या योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले. व त्यानंतर वीस वर्ष पुण्यात नोकरी केली. तसेच आपल्या बुद्धीच्या जोरावर पुढील पाच पाच वर्ष साऊथ कोरिया या देशात नोकरी केली.
शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीवर अवलंबून राहू नये. तसेच त्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी बाबासाहेब यमाजी पुंगळ आणि त्यांच्या पत्नी निर्मला बाबासाहेब पुंगळ या दाम्पत्यांनी स्वकष्टाच्या जोरावर एक आधुनिक यंत्राचे स्पेअर पार्ट बनवण्याचा कारखाना उभा केला.
बिग ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, भाजप आता राष्ट्रवादी फोडणार..
हे सगळं सध्या झालं ते आपल्या शेतकरी आई वडिलांमुळे. त्यांनी शेतात काबाडकष्ट केले त्यामुळे आज आपण उच्च पदावर पोहचू शकलो. त्यांचे ऋण फेडून त्यांचा मानसन्मान कसा करता येईल ह्या हेतूने आपल्या आई वडिलांचा 55 वा लग्नाचा वाढदिवस आणि स्वतःचा २५ वा लग्नाचा वाढदिवस याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक आणि वर्ग मित्र, नातेवाईक,ग्रामस्थ उपस्थित होते.
एमजी हेक्टर कार भेट देऊन त्यांनी आपल्या आईवडिलांचा सन्मान केला. या कार्यक्रमा प्रसंगी नामदार आशुतोष काळे यांनीही भेट देऊन संपूर्ण पुंगळ परिवाराचा सत्कार केला. यावेळी संपूर्ण पुंगळ कुटुंब आणि ग्रामस्थ,मित्रपरिवार उपस्थितीत होता.
महत्वाच्या बातम्या:
Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..
एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश
Published on: 25 July 2022, 06:03 IST