हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मसाल्याच्या पदार्थात हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. स्वंयपाक करताना प्रत्येक भाजीत हळद असणे असते. हळद स्वंयपाक खोली पासून ते आपल्या मेकअपक खोली पर्यंतच्या सर्व वस्तूंमध्ये सामवलेली आहे. सौदर्यप्रसादने असो किंवा औषध हळदीला फार महत्त्व आहे. पुजाविधीसाठी ही हळदीला मान आहे. परंतु बहुसंख्य ठिकाणी मान मिळवणाऱ्याला हळदी उत्पादकांना मात्र आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. परंतु यंदा हळद उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अकोला भागातील शेतकरी हळदीचे पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात. दरवर्षी या पिकाचे लागवड क्षेत्र वाढत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेवटपर्यंत पाणीही उपलब्ध होते. मात्र, आता काढणी केल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना कमी प्रमाणात उत्पादन मिळत असल्याचे समोर आले आहे.
सरासरी उत्पादन ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घटले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र मोठे आहे. त्यात वाशीम जिल्ह्यात हळदीची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. गेल्या महिन्याभरापासून हळद काढणी सुरू झाली होती. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. एकरी सरासरी १०० क्किंटलपेक्षा अधिक ओली हळद होणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ७० ते ८० क्किंटलदरम्यान उतारा मिळाला आहे. यंदा अतिपाऊस झाल्याने, हळदीवर कीडीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकतेला फटका बसला आहे. ओली हळद १०० क्किंटल होत असेल तर ती उकळून वाळविल्यानंतर २० क्किंटल राहते. म्हणजेच पाचवा हिस्साच उत्पादन म्हणून गृहीत धरावा लागतो. हळदीचे बाजारपेठ प्रामुख्याने हिंगोलीत आहे. परंतु संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद आहेत. वाहतुकीला ठिकठिकाणी आडकाठी आणली जाते. यामुळे हळद घरातच साठवून ठेवावी लागते.
Share your comments