News

शेती परवडत नसल्याने अनेक तरुणांनी शहराकडे आकर्षित होऊन पुणे, मुंबई गाठले. तर गावाजवळ छोटी-मोठी शहरे असलेल्या लोकांनी त्या शहरात जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करणे सोयीचे समजले.

Updated on 04 May, 2022 6:13 PM IST

शेती परवडत नसल्याने अनेक तरुणांनी शहराकडे आकर्षित होऊन पुणे, मुंबई गाठले. तर गावाजवळ छोटी-मोठी शहरे असलेल्या लोकांनी त्या शहरात जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करणे सोयीचे समजले. परंतू अवघ्या १ किलोमीटर अंतराच्या आत तालुक्या सारखे शहर असलेल्या तरुणाला शहराची भुरळ न पडणे म्हणजे नवलच! अशाच या कृषी आवलियाला नुकताच वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यापासून हाकेच्या अंतरावरील गोळेगाव या ठिकाणी राहून देखील शहराचे आकर्षण न ठेवता शेती प्रमुख व्यवसाय मानून शेतीत विविध उपक्रम राबवणाऱ्या अवलियाला कृषी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. अष्टविनायकापैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या कुशीतील गोळेगावच्या जितेंद्र बिडवई यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डाळिंब फळ प्रक्रिया आणि फायदे...

२ मे नाशिक येथील धन्वंतरी सभागृहात संपन्न झालेल्या कृषी पुरस्कार वितरण समारंभामध्ये त्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम,

कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या उपस्थितीत "वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील १९८ शेतकरी व अधिकाऱ्यांना यावेळी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीच्या संकटामुळे सन २०१७-१८ व १९ या तीन वर्षातील पुरस्कार यावेळी एकत्रित प्रदान करण्यात आले. जितेंद्र बिडवई यांना यापूर्वी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आनंदाची बातमी : अतिरिक्त ऊसाचे पूर्ण गाळप होणार : साखर आयुक्त
कृषिप्रधान देशाचा कणा "शेतकरी"

वीस वर्षांपूर्वी त्यांनी गोळेगावला बळीराजा कृषी मंडळाची स्थापना करून कृषी मेळावे, कृषी प्रदर्शन, शेतकरी अभ्यास दौरे, द्राक्ष महोत्सव, शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री व एकत्रित खते औषधे खरेदी इत्यादी शेती विषयक उपक्रम चांगल्या प्रकारे राबवले आहेत. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे.

डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम ते नियमित राबवत आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक म्हणून द्राक्ष उत्पादकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात. या कार्याचा गौरव म्ह्णून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

आता 'या' कारणामुळे बिअरचे दर वाढणार...
शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; राजू शेट्टींचा थेट केंद्र सरकारला इशारा

English Summary: Agriculture finally got the honor
Published on: 04 May 2022, 03:44 IST