1. बातम्या

कृषी क्षेत्राच्या संतुलित प्रादेशिक विकासात शेतीपूरक व्यवसायाची भूमिका महत्त्वपूर्ण

नागपूर: कृषी क्षेत्रात संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना शेतीपूरक व्यवसायांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपाद पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


नागपूर:
कृषी क्षेत्रात संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना शेतीपूरक व्यवसायांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपाद पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने अमरावती मार्गावरील संस्थेच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा तसेच महाराष्ट्र राज्याची 25 वी क्षेत्रीय बैठकीसंदर्भात येथील डॉ. एस. पी. रायचौधरी सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी संशेाधन आणि शिक्षण विभागाचे केद्रींय सचिव त्रिलोचल महापात्रा, भारतीय  कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिर्देशक डॉ. के. अलगुसुंदरम, अतिरिक्त सचिव सुशील कुमार, आर्थिक सल्लागार बिंबाधर प्रधान, उपमहानिर्देशक जयकृष्ण जेना, सहाय्यक महानिदेशक सुरेशकुमार चौधरी, निर्देशक सुरेंद्रकुमार सिंग, प्रधान वैज्ञानिक नितीन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. शेती हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. बहुतांश ग्रामीण भारताचा डोलारा पारंपरिक शेती आणि त्याच्या पूरक व्यवसायावर अवलबून आहे. पारंपरिक पूरक व्यवसाय त्या व्यवसायाच्या मर्यादा यामुळे शेतीला सहाय्य व्हावे. याबाबत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कृषी व पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना कृषी व पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरूण व ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगढ गोवा तसेच महाराष्ट्र राज्याची भौगोलिक स्थिती वेगवेगळी असून येथील कृषी उत्पादने भिन्न आहेत. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी मृदा सर्वेक्षण, जलयुक्त शिवार सारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबवून कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात देखील दुबार पिके घेण्यात यश येत आहे. याच धर्तीवर फळे तसेच भाज्यांचे उत्पादन वाढीवर भर दिल्यास कृषी निर्यात क्षेत्रात वाढ निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औद्योगिक विकासामुळे पर्यावरणातील प्रदूषण, वाढत्या लोकसंख्येचा भार, जलप्रदूषण तसेच शेत जमिनीत किटकनाशकांचा वाढता वापर कृषी क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांनी केवळ शेतकी उत्पादनावर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावा. तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संचालन वैज्ञानिक डॉ. एस. चट्टराज तर आभार निर्देशक डॉ. एस. के. सिंग यांनी मानले. या कार्यशाळेत देश-विदेशातील कृषीतज्ञ, अभ्यासक तसेच भारतीय अनुसंधान परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

English Summary: Agriculture allied business is Important role in regional agribusiness development Published on: 11 August 2019, 07:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters