भारताचे अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी असे 314.51 दशलक्ष टन असल्याचा अंदाज सांगण्यात आला असून त्यासोबतच वर्ष 2021-22 या वर्षातील प्रमुख पिकांच्या उत्पादनासाठी तिसरा आगाऊ अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केला असून तो वर्ष 2020-21त्या तुलनेत अधिक आहे.
2021-22 या वर्षातील उत्पादन मागील पाच वर्षाच्या अन्नधान्याचा सरासरी उत्पादन अपेक्षा23.80दशलक्ष टनांनी जास्त आहे.यामध्ये तांदूळ, मका, डाळी, तेलबिया, हरभरा, मोहरी आणि ऊस यांचा विक्रमी उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये काही प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीची शक्यता पाहू.
1- गहू- 2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन 106.41 लक्ष असल्याचा अंदाज असून गेल्या पाच वर्षाच्या सरासरी 103.88 दशलक्ष टन गव्हाच्या उत्पादनापेक्षा ते 2.53दशलक्ष टनांनी जास्त आहे.
2- भरड तृणधान्य- त्याचे उत्पादन अंदाजे 50.70 दशलक्ष टन झाले असल्याचा अंदाज असून गेल्या पाच वर्षाच्या सरासरी 46.57 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 4.12 दशलक्ष टन जास्त आहे.
3- कडधान्य - वर्ष 2021-22 एकूण कडधान्यांचे उत्पादन 27.75 दशलक्ष टन झाले असल्याचा अंदाज असून गेल्या पाच वर्षाच्या सरासरी 23.82 दशलक्ष टन उत्पादना पेक्षा 3.92दशलक्ष टन जास्त आहे.
4- तेलबिया- वर्ष 2021-22 मध्ये देशातील एकूण तेलबियांचे उत्पादन 38.50 लक्ष ठेवून झाले असल्याचा अंदाज असून जे 2020-21 मधील 35.95 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 2.55 दशलक्ष टन जास्त आहे.
5- ऊस- वर्ष 2021 22 मध्ये उसाचे एकूण उत्पादन 430.50 दशलक्ष टन विक्रमी झाले असल्याचा अंदाज असून नेहमीच्या सरासरी 373.46 दशलक्ष टन ऊस उत्पादनपेक्षा 57.04 दशलक्ष टन अधिकआहे.
6- कापूस, ताग-कापसाचे उत्पादन 31.54 लक्षात गाठी म्हणजे प्रत्येकी 170 किलो आणि 10.22 दशलक्ष गाठी म्हणजे प्रत्येकी 180 किलो झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
7- तांदूळ- वर्ष 2021 22 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले असून 2021 22 मध्ये तांदळाची एकूण उत्पादन 129.66 दशलक्ष टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे ते गेल्या पाच वर्षाच्या सरासरी 116.43 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 13.23दशलक्ष टनांनी जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या
Published on: 20 May 2022, 12:04 IST