News

आपण बघतो की अनेक जुनी मानस तरुणांना लाजवतील अशी कामे शेतात करतात, काम करत असताना त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो. अनेक तरुण त्यांच्यापुढे फिके पडतील. याचाच प्रत्येय आता आला आहे. रत्नागिरीत दोन दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली असल्याने ( Agricultural cultivation ) शेती मशागतीची कामांना वेग आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची सध्या शेतातील कामाची लगबग सुरु आहे. यामध्ये एका आजीबाईंनी लक्ष वेधून घेतले आहे.

Updated on 20 June, 2022 2:20 PM IST

यामध्ये या आजीबाईंचा शेतात नांगरणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आजीबाईंचा उत्साह आणि (Kharif Season) खरिपातील पेरणी शेतकऱ्यांसाठी किती महत्वाची आहे याचाच प्रत्यय आजीबाईंच्या व्हिडिओमधून पाहवयास मिळत आहे. शेतकऱ्यांना पाऊस किती महत्वाच्या आहे, आणि त्यानंतरची लगबग किती महत्वाची आहे, हे यावरून दिसून येते.

या व्हिडिओमध्ये पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग आजीबाईंच्या हातामध्ये असल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतीच्या कामांमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. बदलत्या काळातही कुंभार्ली गावच्या 78 वर्षाच्या सुनंदा वसंत सकपाळ या आजीबाईंनी स्वत: मध्ये बदल करुन थेट पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग हातामध्ये घेतले. या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून त्यांनी भात शेतीसाठी मशागतीचे काम केले आहे. त्यांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. आताच्या तरुणांसाठी हे प्रेरणादाई आहे.

मोठी बातमी! दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी, अमूल ग्रुपने घेतला मोठा निर्णय..

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उत्पादन वाढीसाठी ही मशागत महत्वाची मानली जाते. शिवाय आता पावसामध्ये सातत्य राहिले तर लवकर धान पिकाची लागवडही होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील चित्र बदलले असून शेती मशागतीची कामे अधिक गतीने होत आहेत. इतर जिल्ह्यात मात्र अजूनही पाऊस पडला नाही.

महत्वाच्या बातम्या;
शेती हा बांधावरुन करण्याचा विषय नाही तर..., बिजमाता राहिबाईंचा मोलाचा सल्ला
कांद्याचा नाशिकमध्ये वांदा, शेतकरी म्हणाले कांद्यासाठी पुणे मार्केटच लय भारी..
दारू पिल्यावर तो व्यक्ती इंग्रजी संभाषण का करतो, जाणून घ्या खरे कारण..

English Summary: Age 78 passion enthusiasm work !! Farming paddy production Aji
Published on: 20 June 2022, 02:20 IST