News

सध्या शेतकरी पुत्रांना मुली मिळत नाहीत. अनेक ठिकाणी मुली मिळत नसल्याने आंदोलन देखील करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलगी देखील शेतकरी जोडीदार नको, अशी अट घालते. यामुळे या मुलांची अडचण निर्माण झाली आहे.

Updated on 10 July, 2023 1:27 PM IST

सध्या शेतकरी पुत्रांना मुली मिळत नाहीत. अनेक ठिकाणी मुली मिळत नसल्याने आंदोलन देखील करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलगी देखील शेतकरी जोडीदार नको, अशी अट घालते. यामुळे या मुलांची अडचण निर्माण झाली आहे.

नोकरदार मुलगा असावा, अशी अपेक्षा बहुतांश मुलीच्या पालकांची पाहायला मिळत आहे. असे असताना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीनं मला शेतकरी नवराच हवा असल्याचा हट्ट धरला आहे.

आईवडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मुलगा नोकरीवाला शेधतात. मुलगी डॉक्टर असेल तर मुलगा डॉक्टरच शोधतात. तसेच शिक्षक, इंजिनिअर, बँकेत, पोलीस आदी क्षेत्रांत मुली नोकरी करत असल्यास, त्याच क्षेत्रात नोकरी करणारा मुलगा शोधला जातो.

छत्रपती कारखान्यावर मोठा राडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की...

शेतकरी मुलांना मुलींचं स्थळ भेटणं अवघड झालं आहे. महानगरात राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुली शक्यतो शहरी मुलांसोबत लग्न करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही.

परंतु, पदवीधर बँकेत नोकरी करणाऱ्या नांदेडच्या साप्ती गावातील वैष्णवी दिंगबरराव कदम हिने मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे, असा वडिलांकडे हट्ट धरला आहे.

शेणाशी संबंधित हे व्यवसाय करतील तुम्हाला श्रीमंत, शेतकरी बांधवांनो जाणून घ्या..

यामुळे तिचा हा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला आहे. वैष्णवीच लग्नाचं वय झाल्यावर तिच्या पालकांकडून तिच्यासाठी जोडीदाराचा शोध घेतला जात होता. मुलीचे एवढ शिक्षण झाले, तसेच ती बँकेत नोकरीला असल्याने आपला जावाई देखील नोकरीवाला असावा म्हणून त्यांच्याकडून मुलाचा शोध सुरु होता.

पण आपला जोडीदार शेतकरीच असावा असा हट्ट वैष्णवीने धरला. लग्न करेल तर फक्त शेतकरी मुलासोबतच अशी भूमिका तिने घेतली. त्यामुळे शेवटी तिची इच्छा पालकांनी पूर्ण केली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शेतकरीपुत्र नितीन याच्याशी वैष्णवीचा विवाह होणार आहे.

कृषी जागरणचे राष्ट्रीय व्यासपीठ देशातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान..
शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने सुरू केली बक्षीस योजना, जाणून घ्या...
पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार, IMD चा 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी

English Summary: A farmer needs a husband! The stubbornness of a highly educated working girl, her father finally fulfilled her wish..
Published on: 10 July 2023, 01:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)