१९८८ साली विद्यार्थी दशेतच शरद जोशी यांच्या कार्यास प्रेरीत होऊन राजू शेट्टी शेतकरी चळवळीमध्ये सहभागी झाले. चळवळीच्या सुरवातीस ते सायकलवरून लोकांना चळवळीचे महत्व पटवून देण्यासाठी शिरोळ परिसरातील गावात फिरत असायचो. त्याकाळी लोकांना चळवळीचे महत्व सांगून त्यांना चळवळीत सहभागी करून घ्यायचे व आंदोलन करायचे म्हणजे तारेवरची कसरत असायची.
आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने मी लोकांना चळवळीचे महत्व व आंदोलनाची दिशा देण्यासाठी प्रत्येक गावात सभा घेण्यासाठी स्टेज किंवा मंडप घालण्यासाठी पैसे नसल्याने गावातील मंदिरात सभा घ्यायचो. मी ज्यावेळी ३१ वर्षांपूर्वी शिरटी गावात चळवळीच्या निम्मीत्ताने पहिले पाऊल ठेवलो.
गावात लोकांना एकत्रित करण्यासाठी त्यावेळेस माईकची सुविधा नव्हती मात्र या गावात येणार म्हंटल्यावर मातंग समाजातील बयाजी हा स्वत:ची हालगी घेऊन माझ्यापुढे वाजवत जायचा. लोक त्या हालगीचा आवाज ऐकुण लोक मंदिरात येत असत. त्यावेळेस लोक एकत्र आले की मला चळवळीस आर्थिक मदत म्हणून पैसे गोळा करत असत.
राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका, सभासदांना 41 कोटी परत देण्याचे आदेश
ही गोष्ट ज्यावेळी बयाजीच्या लक्षात आली त्यावेळेस बयाजीनीही आपल्या फाटक्या सद-यातील खिशात हात घालून मदत म्हणून माझ्या खिशात दहा रूपयाची नोट घातली. ज्यावेळी बयाजींनी मला ही दहा रूपयाची नोट खिशात घातली त्याचवेळी माझी ही चळवळ कधीच पैशासाठी थांबणार नाही असा आत्मविश्वास निर्माण झाला. गेली ३१ वर्षे हे बयाजी मी ज्यावेळी गावात जाईन त्यावेळेस मला न चुकता स्वत:च्या खिशातून दहा रूपये देतात.
शेतकऱ्यांनो १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा, त्यानंतर होतोय खोडकिडीचा प्रादुर्भाव
इतकेच नव्हे तर महिन्यातून एकदा शिरोळला माझ्या निवासस्थानी येऊन ग्रामदैवत भैरेश्वर मंदिरातील अंगारा व दहा रूपयाची नोट देऊन जात असत. अशा या बयाजींचे दुःखद निधन झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
महत्त्वाच्या बातम्या;
पारवडी येथे ऊस खोडवा पाचट कार्यक्रम संपन्न, शेतकऱ्यांना होणार फायदा\
पुन्हा शेतकरी मैदानात! देशातील 550 जिल्ह्यांतील शेतकरी दिल्लीत 'गर्जना रॅली' काढून गर्जना करणार
साखर करारात मोडतोड, निर्यातदारांनी कारखान्यांकडे केले दुर्लक्ष
Share your comments