Market Price

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरु आहे. त्यामुळे लाखो हेक्टर वरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक भाजीपाला पिकांचे दर गगनाला भिडले आहेत.

Updated on 15 September, 2022 11:06 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरु आहे. त्यामुळे लाखो हेक्टर वरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to crops) झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक भाजीपाला पिकांचे दर गगनाला भिडले आहेत.

सध्या पितृपक्षाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे भाजीपाला (vegetables) खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. गवार आणि दोडक्याचे दर शंभर च्या पुढे गेले आहेत.

आवक 30 ते 40 टक्क्यांनी घटल्याने भाजीपाल्यांचे दर (Vegetable rates) तेजीत आहेत. टोमॅटो देखील चाळीस रुपयांपेक्षा महाग झाले आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत.

Pearl Farming: शेतकऱ्यांनो केवळ २५ हजार गुंतवा आणि ३ लाख कमवा

येत्या दीड ते दोन महिने भाजीपाल्यांचे दर तेजीत राहण्याचा नादाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक भाजीपाला मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. नाशिक (Nashik) बाजार समितीमधून मुंबईसह उपनगर, गुजरात, सूरत या शहरांना भाजीपाला पाठवला जातो.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विविध भाजीपाल्यांचे उत्पादन घेत असतात. त्यामुळे ताजा भाजीपाला थेट बाजारसमितीत मिळत असल्याने ग्राहक गर्दी करत असतात. पितृपक्षात भाजीपाला हा जास्तच दराने ग्राहकांना खरेदी करावा लागतो, मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

कामाची बातमी! PF खात्यावर मिळणार पेन्शन; जाणून घ्या नियम आणि अटी

गवार, दोडके यांनी तर अक्षरशः शंभरी पार केली आहे. वांगी 60 रुपये किलो, बटाटा, फ्लॉवर, कोंबी 30 रुपये किलो तर भेंडी 80 रुपये किलो दराने मिळत आहे. शेवगा 300 रुपये किलो, दोडका आणि गिलके 100 रुपये किलो, गवार 160 रुपये किलो, श्रावण घेवडा सुद्धा 100 रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे.

महत्वाच्या बातम्या:
Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह या 21 जिल्ह्यांना इशारा
Gold Price Today: खुशखबर! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर १० ग्रॅम सोने खरेदी करा ५९०० रुपयांनी स्वस्त...

English Summary: Vegetable prices are tight!
Published on: 15 September 2022, 11:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)