Market Price

सध्या बाजारात सोयाबीन पिकाला (Soybean crops) चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीन (Soybean) दरात बदल झाला आहे. त्यामुळे आज सोयाबीनला भाव काय मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated on 23 August, 2022 10:05 AM IST

सध्या बाजारात सोयाबीन पिकाला (Soybean crops) चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीन (Soybean) दरात बदल झाला आहे. त्यामुळे आज सोयाबीनला भाव काय मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Farmers Subsidies: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी मिळणार 12 लाख रुपये अनुदान

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काल सायंकाळी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Agricultural Produce Market Committee) बाजारभावानुसार सोयाबीनला 6 हजार 141 इतक्या रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

सोयाबीनला हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) येथे मिळाला आहे. काल संध्याकाळपर्यंत सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली. व ही आवक 5 हजार 308 क्विंटल इतकी झाली आहे.

Animal Disease: जनावरांमधील संसर्गजन्य आजारावर करा वेळीच उपचार; जनावरे दगावणार नाहीत

सोयाबीनला किमान भाव 5 हजार 860 रुपये मिळाला तर कमाल भाव 6 हजार 141 रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव 6 हजार 70 रुपये इतका मिळाला आहे.

या खालोखाल धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soybean Market Price) तीन क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याठिकाणी किमान भाव 5 हजार 500 रुपये, कमाल भाव 6 हजार 105 आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 800 रुपये इतका मिळाला आहे.

जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा; करा वेळीच उपचार, अन्यथा होईल मोठे नुकसान

सोयाबीन बाजारभाव (22/08/2022)

जळगाव या ठिकाणी सोयाबीनला किमान भाव 5 हजार 5740 रुपये मिळाला तर कमाल भाव 5 हजार 740 रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 740 रुपये इतका मिळाला आहे. तर याठिकाणी 136 क्विंटल ची आवक झाली.

औरंगाबाद या ठिकाणी सोयाबीन ला किमान भाव 5 हजार 400 रुपये मिळाला तर कमाल भाव 5 हजार 600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 500 रुपये इतका मिळाला. या ठिकाणी 3 क्विंटलची आवक झाली.

नागपूर या ठिकाणी किमान बाजारभाव 5 हजार मिळाला तर तर कमाल बाजारभाव 5 हजार 825 तर सर्वसाधारण बाजारभाव 5 हजार 619 इतका मिळाला. या ठिकाणी 239 क्विंटल ची आवक झाली.

महत्वाचे म्हणजे दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी सोयाबीन (Soybean) न्यावा.

महत्वाच्या बातम्या 
Horoscope 23 August: मंगळवार या राशींसाठी आहे शुभ; मिळेल आनंदवार्ता
Weed Control: असे करा मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, पिकांमधील तणाचे नियंत्रण
दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा

English Summary: Soybean market price changes
Published on: 23 August 2022, 09:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)