Horticulture

आंतरपीक ही संकल्पना मुळात मुख्य पिकाच्या बाबतीतली जी काही जोखीम असते ती कमी करण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे. फळबागांमध्ये देखील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून उत्तम कमाई करता येऊ शकते. आपल्याला माहित आहे की फळझाडांची लागवड ही जास्त अंतरावर केलेली असते त्यामुळे फुल पीक लागवडीसाठी एक चांगला स्कोप असतो. फळबागांमध्ये अर्धवट सावली आवश्यक असणाऱ्या पिकांची निवड खूप महत्त्वाचे ठरते.

Updated on 10 August, 2022 7:26 PM IST

 आंतरपीक ही संकल्पना मुळात मुख्य पिकाच्या बाबतीतली जी काही जोखीम असते ती कमी करण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे. फळबागांमध्ये देखील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून उत्तम कमाई करता येऊ शकते. आपल्याला माहित आहे की फळझाडांची लागवड ही जास्त अंतरावर केलेली असते त्यामुळे फुल पीक लागवडीसाठी एक चांगला स्कोप असतो. फळबागांमध्ये अर्धवट सावली आवश्यक असणाऱ्या पिकांची निवड खूप महत्त्वाचे ठरते.

फुल पिकांची लागवड मुख्य पीक म्हणून न करता जर आंतरपीक म्हणून केली तर खूप फायद्याचे ठरू शकते. फळबागेत फूल पिकांचा अंतर्भाव केला तर नक्कीच आर्थिक फायदा जास्तीचा होतो.

नक्की वाचा:खजूर शेती: खजुराचे एक झाड देते 50 हजार रुपयांचे उत्पन्न, होऊ शकता काही वर्षात करोडपती

 फळबागेत फुल पिकांचे आंतरपीक म्हणून लागवड

 आंबा, चिकू, सिताफळ, द्राक्ष, संत्रा आणि डाळिंब सारख्या फळबागेत झाडांचे अंतर जास्त असते त्यामुळे फुल पिकाची लागवड या अत्यंत कार्यक्षम रीतीने करता येते.

बऱ्याच प्रयोगातून सिद्ध देखील झाले आहे की जर फुल पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश केला तर मुख्य पिकाच्या उत्पन्नावर किंवा त्याच्या गुणवत्तेवर कुठल्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होत नाही.

 फूल पिकांच्या आंतरपीक घेण्याचे फायदे

 फुल पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करायची असेल तर महत्त्वाचा फायदा म्हणजे याची आवश्यकता आणि मागणीनुसार मुख्य पिकांमध्ये लागवड करता येते व या फळपिकांचा सापळा पीक म्हणून देखील चांगला उपयोग करता येतो.

तसेच फळ बागांमधील दोन झाडांच्या मध्ये जिथे मोकळी जागा असते त्याचा फूल पिकांच्या लागवडीसाठी उत्तम पद्धतीने वापर शक्य होतो.

त्यामुळे कमी कालावधीत पिकांपासून चांगले उत्पादन मिळते. तसेच आपण जेव्हा दोन फळपिकांच्या झाडांमध्ये असलेल्या मोकळ्या जमिनीत जेव्हा फुल पिकांची लागवड करतो तेव्हा तणाचा प्रादुर्भाव होत नाही व त्यामुळे तणनियंत्रणासाठी चा खर्च कमी होतो.

नक्की वाचा:शेतात गाळ टाका! परंतु घ्या ही काळजी अन नका वापरु 'ही' गाळमाती

 आंतरपीक घ्या परंतु ही काळजी घ्या

 सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही फुल पिकांची आंतरपीक म्हणून लागवड कराल तेव्हा मुख्य पीक व आंतरपीक यांचा वाढीचा कालावधी नेमका किती आहे, याचा अभ्यास करूनच निवड करणे गरजेचे आहे. आता यामध्ये उदाहरणच द्यायचे झाले तर तुम्ही जर लिली या फुलाची लागवड बटाट्यासारख्या कंदवर्गीय पिकासोबत केली तर ते यशस्वी होत नाही कारण

लिली हे कंदवर्गीय पीक आहे व बटाटा देखील कंदवर्गीय आहे. तसेच आपण फळ बागेमध्ये मशागतीसाठी बर्‍याचदा ट्रॅक्टर सारखे यंत्राचा वापर करत असतो त्यामुळे आंतरमशागत करताना ट्रॅक्टर फिरण्यासाठीची जागा वगैरे इत्यादी गोष्टी लक्षात घेऊनच लागवडीचे नियोजन करणे महत्त्वाचे असते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फळबागेत फुलांच्या आंतरपीक म्हणून लागवड कराल तेव्हा फळांचा हंगाम लक्षात घेऊनच लागवड करणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:फायदेशीर लागवड: कोरडवाहू शेतीत चिंच लागवड ठरेल एक राजमार्ग, शेतकऱ्यांना होईल फायदा

English Summary: intercropping in fruit orchred is give financial support to farmer
Published on: 10 August 2022, 07:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)