Horticulture

आंब्याची लागवड करण्यासाठी जमीन तळजमीन या दोन्ही प्राकृतिक बाबींचे महत्त्व रासायनिक गुणधर्म पेक्षा जास्त आहे.

Updated on 27 April, 2022 4:14 PM IST

 आंब्याची लागवड करण्यासाठी जमीन तळजमीन या दोन्ही प्राकृतिक बाबींचे महत्त्व रासायनिक गुणधर्म पेक्षा जास्त आहे.

 आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडील हवामान आंबा पिकास अनुकूल असून सर्वसाधारण सर्व जिल्ह्यात आंबा चांगला येऊ शकतो. परंतु आंबा उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आंबा उत्पादन जास्त आणि कमी खर्चात शक्य आहे. तसे पाहायला गेले तर मराठवाड्यामध्ये केशर आंब्याची लागवड जास्त होत आहे. जवळ जवळ आठ ते दहा चार एकर क्षेत्रावर केसर आंबा आहे. मराठवाड्यामध्ये परदेशी आंब्याला लागवडीच्या धर्तीवर काही शेतकऱ्यांनी अतिघन लागवड व इतर आधुनिक बाबींचा वापर करून केशर आंबा लागवड सुरू केली आहे. या लेखामध्ये आपण आंबा लागवडीसाठी घन लागवड पद्धतीची माहिती  घेऊ.

 आंबा लागवडीसाठी घन लागवड पद्धत त्याचे फायदे

  आंबा लागवडीसाठी 10 बाय 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता घन लागवड पद्धतीत  पाच बाय पाच मीटर किंवा 5 मीटर बाय सहा मीटर अंतरावर करणे जास्त फायद्याचे आहे. असे दिसून आले आहे. या अंतरावर झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. म्हणजे तोपर्यंत आपणास या बागेतून चारपट उत्पन्न मिळते. कारण दहा बाय दहा मीटर अंतरावर आंबा लागवड केल्यास हेक्‍टरी 100 झाडे बसतात. पाच बाय पाच मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्‍टरी 400 झाडांची संख्या ठेवणे शक्‍य होते. या पद्धतीमध्ये झाडांचा घेर व उंची मर्यादित ठेवता येते. त्यासाठी छाटणी आणि वाढ निरोधकांचा वापर करता येतो. इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेत तर तीन बाय एक मीटर अंतरावर लागवड यशस्वी झाली आहे. त्या ठिकाणी  प्रति हेक्‍टरी 3333 झाडांची संख्या असते.

 घन लागवडीचे फायदे

 ठराविक क्षेत्रातून जास्त उत्पादन, झाडे लहान असल्यामुळे फळांची विरळणी, फवारणी, छाटणी इत्यादी गोष्टी करणे सोपे होते

आंबा फळांची काढणी खुडी व झेला न वापरता हाताने करणे शक्य होते. फळांची गुणवत्ता व प्रत सुधारण्याचे वेगवेगळे उपाय करणे सहज शक्य होते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो! आपण बऱ्याचदा कलम करतो परंतु कलमाच्या विविध सुधारित पद्धती जाणून घेणे आहे महत्वाचे

नक्की वाचा:कदाचितच माहित असतील या मिरचीच्या जाती! परंतु जर लागवड केली तर मिळते बक्कळ उत्पादन

नक्की वाचा:देशात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी लोन घेण्याचा विचार करत आहात का? 'ही'कागदपत्रे असतात आवश्यक

English Summary: ghan cultivation method is important for mango orcherd cultivation
Published on: 27 April 2022, 04:11 IST