कुठलेही पिके अथवा फळबागा पासून जास्तीचे उत्पादन हवे असेल तर त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सगळे अचूक व तंतोतंत नियोजन करावे लागते.
लागवडीनंतर सुयोग्य पाणी व्यवस्थापन,लागणाऱ्या खतांच्या अचूक व्यवस्थापनया गोष्टी पिकांप्रमाणेच फळबागांमध्ये देखील महत्वाचे ठरतात.नियोजन आणि व्यवस्थापन अचूक आणि तंतोतंत व शास्त्रीयदृष्ट्या असेल तर पिकांप्रमाणे फळबागेचे देखील चांगले उत्पादन मिळते.
हीच बाब लिंबू बागेला देखील लागू होते. लिंबू फळबाग आला देखील योग्य खतांचे व्यवस्थापन केले तर चांगले उत्पादन येते. त्यामुळे लिंबू फळ बागेपासून चांगले उत्पादन मिळण्यासाठी काही प्रकारच्या सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. या लेखामध्ये आपण लिंबू फळबागेसाठी खत व्यवस्थापन कसे करायचे याबाबत माहिती घेऊ.
लिंबू फळबागेला खत व्यवस्थापन
लिंबू बागेला शेणखतचा वापर
1- लिंबू च्या झाडांना चांगले कुजलेले व तयार झालेले शेणखत चांगल्या वाढीसाठी द्यावे.
2- शेणखत देताना ते चांगल्या प्रतीचे व शरद ऋतूमध्ये वापरावे.
3- लिंबू च्या झाडा सोबती मातीमध्ये खते चांगल्या प्रमाणात मिसळावे.
4-तसेच झाडाच्या अवतीभवती दोन इंच कंपोस्ट खत पसरावे. लिंबाच्या झाडाचे नुकसान होऊ नये म्हणून साल देठापासून किमान दोन इंच दूर ठेवावी. तसेच प्रति झाडास प्रति वर्ष एक गॅलन कंपोस्ट खत वापरावे.
लिंबूच्या झाडाला एनपीकेचा वापर
1- लिंबुच्या झाडाला खत देताना नत्राचे प्रमाण 8-8-8 पेक्षा जास्त नसावे.
2- जेव्हा लिंबूच्या झाडाची वाढीची अवस्था असेल तेव्हा एनपीके चा पुरवठा खूप महत्वाचा ठरतो.
3- नायट्रोजन एप्लीकेशन चे तीन फिडिंग मध्ये विभागणी करावी. ती म्हणजे फेब्रुवारी, मे आणि सप्टेंबर या महिन्यात द्यावे.
4- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्यात लिंबूच्या झाडाला जास्त प्रमाणात खत देऊ नये. झाड मरण्याची शक्यता जास्त असते.
साइट्रस गेन फर्टीलायझर
या खतातील पोषक गुणोत्तर 8-3-9 अशा प्रकारचे आहे. लिंबूवर्गीय वनस्पतींच्या गरजांसाठी तयार केले जाते आणि मुळाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. या खतामुळे झाडाला अधिक लिंबू लागतात. या खतांमध्ये मॅग्नीज, लोह, तांबे आणि जास्त मोठ्या प्रमाणात असते.
एस्पोमा साइट्रस प्लांट फूड
या या खताचे पोषक गुणोत्तर 5-2-6 असे असून ते लिंबाच्या झाडावर वर्षातून तीन वेळा लावावे लागते. एक नैसर्गिक आणि सेंद्रिय खत आहे.
लिंबू च्या झाडांना अशा पद्धतीने द्यावे खत
1- वसंत ऋतूच्या सुरुवातीस आणि उन्हाळ्यात दर चार ते सहा आठवड्यांनी एकदा आपल्या लिंबाच्या झाडाला खत द्यावे.
2- लिंबाच्या झाडाच्या वाढी दरम्यान चार ते सहा आठवड्याच्या अंतराने खत दिल्यास लिंबाच्या झाडाला वाढण्यास व फळ देण्यास पुरेसे पोषक असतात याची खात्री होईल.
3- लिंबू चे झाड जेव्हा उन्हाळ्याच्या उत्तरार्धामध्ये उत्पादन कमी करते तेव्हा पुढील वसंत ऋतु पर्यंत खत देणे थांबवावे. लिंबाच्या झाडाला दरवर्षी योग्य हंगामात खत घालण्याची व्यवस्था करावी.
महत्त्वाच्या बातम्या
Published on: 20 May 2022, 01:39 IST