आपल्याला माहित आहेच कि आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंब्याच्या अनेक प्रकारच्या जाती असून भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंबा लागवड केली जाते.
परंतु या सगळ्या आंब्यांच्या जाती मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील हरदोई येथे पिकवलेल्या शहाबादी आंब्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे शहाबादी आंब्याला परदेशातून प्रचंड मागणी आहे.
खरे पाहायला गेले तर शहाबाद च्या जमिनी मध्ये अनेक प्रकारचे आंब्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु यामध्ये देश-विदेशात पसरलेले शहाबादी आंब्याचे ग्राहक आंब्याची ऑर्डर नोंदवतात.
शंभरहून अधिक जातींचे घेतले जाते आंब्याचे उत्पादन,याच ठिकाणी आहे आमिर खानची जमीन
हरदोई चे शहाबाद हे आंबा उत्पादनासाठी विदेशात लोकप्रिय आहे. यामुळे येथे पिकवलेले आंब्यांना शहाबादी आंबे असे म्हणतात. या शहाबादी आंब्यामध्ये 100 पेक्षा जास्त जाती असूनशहाबाद मध्ये सुमारे साडेपाच हजार हेक्टर मध्ये आंब्याच्या बागा बहरल्या असून या बागांमध्ये 100 पेक्षा जास्त जातींची आंब्याची लागवड करण्यात आली आहे.
या ठिकाणी शहाबाद च्या अखतियारपूर गावात चित्रपट अभिनेता आमिर खानची देखील 200 बिघामध्ये आंब्याची बाग आहे.
नक्की वाचा:मोठ्या मनाची कोंबडी; भर वादळात दिला मांजरीच्या पिल्लांना आसरा
या आंब्याला आहे प्रचंड मागणी
शहाबाद मध्ये पिकलेला आंबा दिल्ली,मुंबई येथून थेट परदेशात निर्यात केला जातो. याठिकाणी पिकवल्या जाणाऱ्या आंब्यामध्ये गुलाब खस, दसरी,पोपट परी, हुस्न आरा,चौसा, जनार्दन प्रसाद इत्यादी जातींच्या शहाबादी आंब्यांना देशभरात मोठी मागणी आहे.
याबाबतीत जिल्हा फलोत्पादन अधिकारी सुरेश कुमार सांगतात की, पोपट परी आणि हुस्न आरा तसेच शहाबाद मध्ये पिकवलेले गुलाब सुंदर तसेच स्वादिष्ट आहेत.मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये यांना खूप पसंती दिली जाते.शहाबाद भागातून मुंबई,दिल्ली,हरियाणा, पंजाब आणि बिहार मध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
नक्की वाचा:आता मोंदींचे 2 हजार थेट तुमच्या घरी येणार; बँकेत जाण्याचा त्रासही मिटणार
नक्की वाचा:टरबूज खा परंतु सांभाळून!नाहीतर टरबूज ओव्हर डोसचा होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम?
Published on: 03 June 2022, 12:50 IST