Health

आपल्याला माहितीये आपण घेतलेल्या आहारावरून आपले जीवन ठरत असते, त्यानुसार आपल्या शरीरावर परिणाम जाणवत असतात. त्यामुळे डॉक्टर आपल्याला चांगल्या आहाराचा सल्ला देतात. याशिवाय रोजच्या चालण्याने सुद्धा आपण पाहिजे तसा आपल्या शरीरात बदल करू शकतो.

Updated on 25 September, 2022 1:21 PM IST


आपल्याला माहितीये आपण घेतलेल्या आहारावरून (food) आपले आरोग्य ठरत असते, त्यानुसार आपल्या शरीरावर परिणाम जाणवत असतात. त्यामुळे डॉक्टर (doctor) आपल्याला चांगल्या आहाराचा सल्ला देतात. याशिवाय रोजच्या चालण्याने सुद्धा आपण पाहिजे तसा आपल्या शरीरात बदल करू शकतो.

आपले तारुण्य आपले राहणे, बोलणे, वागणे, सवयी यावर अवलंबून असते. बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आपल्या शरीराची मजबूत आणि प्रतिकार शक्ति महत्वाच्या असते, त्यामुळे या गोष्टींकडे महत्व देणे तितकेच गरजेचे असते.

युनिव्हर्सिटी ऑफ लीसेस्टरच्या (University of Leicester) संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसातून कमीत कमी 10 मिनिटे वेगाने चालण्याने दीर्घायुष्य वाढते. विशेष म्हणजे जलद चालणाऱ्यांचे आयुर्मान हे हळू चालणाऱ्यांपेक्षा 20 वर्षांपर्यंत जास्त असते. त्यामुळे रोज सकाळी शूज घालून चालण्याचा प्रयत्न करा. याने तुम्हाला नक्कीच चांगला फायदा जाणवेल.

विशेष म्हणजे महत्वाच्या 4 चालण्याच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. यानुसार तुमचे चालणे सुरू झाले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शरीराबाबत फरक जाणवू लागेल. या 4 चालण्याच्या क्रिया तुमचे तारुण्य नक्कीच कायम ठेवतील. चालण्याच्या या 4 प्रकाराविषयी जाणून घेऊया.

कुंडलीत चक्र आणि समुद्र योग असणारे लोक जगतात राजासारखे जीवन; तुमच्या कुंडलीत आहे?

1) लंच आणि डिनर नंतर चाला

तुम्हाला लांब चालण्याचा कंटाळा येत असेल तर दिवसातून दोनदा चालण्याची पद्धत सुरू करा. दिवसातून दोनदा चालण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एक दुपारच्या जेवणानंतर आणि दुसरे रात्रीच्या जेवणानंतर चालणे. जेवणानंतर चालणे शरीरातील इन्सुलिन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. याचा फरक नक्कीच तुम्हाला जाणवेल.

2) हलक्या वजनाने चाला

आपण पाहिले तर हलक्या वजनाने लोकांना चालताना त्रास होत नाही. सवय असल्यामुळे ते नियमित चालत असतात. असे चालण्याने तुम्हाला थोडेसे कष्ट जाणवेल. मात्र हे अधिक कॅलरी बर्न करण्यात आणि अधिक स्नायू तयार करण्यात मदत करेल. तुम्हाला जसे झेपेल तसे करा मात्र सावध राहून कारण मानेला किंवा खांद्याला दुखापत होऊ शकते.

26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात यलो अलर्ट जारी

3) कधी वेगवान तर कधी मध्यम गतीने चालण्याची सवय लावा

चांगला फायदा मिळविण्यासाठी चालताना तुम्हाला दोन पद्धतींचा वापर करावा लागेल. समजा जर तुम्ही वेगाने जात असाल तर स्विच करताना वेग थोडा कमी करा. ही पॉवर चालण्याची शैली तुमच्या शरीराला आव्हान देईल, तुमची हृदय गती वाढवेल आणि तुमची कॅलरी बर्न (Burn calories) वाढवेल. या पद्धतीचा फायदा नक्कीच तुम्हाला होऊ शकतो.

4) दररोज चालत चालत जिना चढा

तुम्ही दिवसभरात अशा अनेक गोष्टी करू शकता ज्याचा तुमच्या शरीराला अधिक फायदा होऊ शकतो. दररोज जिना चढणे हे तुमच्या शरीरासाठी उत्तम ठरू शकते. या प्रक्रियेने तुम्हाला नक्कीच तुमच्या शरीरात फरक जाणवेल.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक बातमी! सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जमा होणार पीएम किसान योजनेचे पैसे
कौतुकास्पद! तब्बल 250 एकरवर गवती चहाची लागवड; 80 शेतकरी घेत आहेत लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन! उडीदाला मिळतोय 10 हजारांवर बाजारभाव

English Summary: Your youth determined your walk act remain young forever
Published on: 25 September 2022, 01:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)