Health

सध्या उन्हाळा सुरू झाला असून राज्याच्या बऱ्याच भागात पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाडा सध्या जाणवत आहे.

Updated on 31 March, 2022 10:57 AM IST

सध्या उन्हाळा सुरू झाला असून राज्याच्या बऱ्याच भागात पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाडा सध्या जाणवत आहे.

अशा उन्हाळ्याच्या तापदायक परिस्थितीत आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. अशा वातावरणात शरीराच्या विविध भागांच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये आपल्या हृदयाची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.  कारणहृदयरोग रुग्णांच्या समस्या या काळात वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते. त्याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊ.

नक्की वाचा:आपत्कालीन भारनियमनाचे संकट: विजेची मागणी प्रचंड वाढली, महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये सध्या कोळसा टंचाई

या गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष           

1- बेशुद्ध पडणे- उन्हाळ्यामध्ये शेतात काम करत असताना किंवा बाहेर कुठे गेलात तर  अचानक बेशुद्ध पडण्याचे समस्या उद्भवते. यामागील  कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमी होणे किंवा अतिशय प्रमाणात ऊन लागल्याने ही समस्या उद्भवू शकते. हृदय जेव्हा सामान्यपणे रक्ताभिसरण करू शकत नाही, त्यामुळे  अशी स्थिती उद्भवू शकते. या समस्येकडे  वेळीच लक्ष देणे खूप गरजेचे आहे नाहीतर हार्ट अटॅक येण्याचा धोका संभवतो.

2- थकवा जाणवणे- जर तुम्हाला लवकर थकवा जाणवत असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. कार्डियाक अरेस्ट मध्ये शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते परंतु बरेच जण  उष्णतेमुळे  थकवा आल्याचे समजून याकडे दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घेणे फायद्याचे ठरते.

3- मायग्रेन-उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेचे मध्ये मायग्रेनचे समस्या वाढू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचे प्रमुख कारण उष्णता नाही परंतु या ऋतूमध्ये मायग्रेनचा रूग्णाच्या हृदयावर खूप दबाव असतो. नेमके उष्णतेच्या  संपर्कात जास्त आल्याने हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळेदेखील हार्टऍटॅक येऊ शकतो.

नक्की वाचासुपर ॲप देणार शेतकऱ्यांना सुपर पावर; केंद्र सरकार लवकरच करणार हे ॲप लॉन्च, वाचा याबद्दल माहिती

4- डीहायड्रेशन- बरेचजण शरीरात पाण्याची कमतरता झाली म्हणून डीहायड्रेशन कडे दुर्लक्ष करतात. परंतु हे प्राणघातक ठरू शकते. ज्या लोकांना डिहायड्रेशन चा त्रास आहे अशांना उन्हाळ्याच्या दिवसात हार्ट अटॅकची शक्यता वाढू शकतो.

5- वाढते वजन- उन्हाळ्यामध्ये बरेचजण मॉर्निंग वॉकचा वेळ कमी करतात व अशा परिस्थितीत शरीरात चरबी वाढू लागल्याने त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. चरबी वाढल्याने हृदयाचा आकार वाढतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा झटकाकिंवा पॅरेलेसेस या आजारांचा धोका वाढतो.

नक्की वाचा:पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने देखील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात केली वाढ

उन्हाळ्यात हि काळजी घ्यावी

1-जर तुम्हाला दररोज थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2- जर उन्हाळ्याच्या परिस्थितीत कोणी बेशुद्ध पडले तर अशा रुग्णाला त्वरित पाणी,  एखादा ज्यूस द्यावा आणि त्याच्या अंगावरचे कपडे सैल करावेत.

3- सकाळचा नाश्ता जरूर करावा व नाश्त्यात मोड आलेले धान्याचा  वापर करावा.

4- थंड पाण्याने अंघोळ करावी त्यामुळे हृदयविकार आतही फायदा होतो.

5-हृदयरोगाचा त्रास असलेल्या रुग्णांनी उन्हाळ्यात सहा ते सात लिटर पाणी प्यावे.( संदर्भ -दिव्य मराठी )

English Summary: take precaution in summer session mainly heart disease patient
Published on: 31 March 2022, 10:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)