1. आरोग्य सल्ला

प्रोबायोटिक्स: एक मानव वरदान

प्रोबायोटिक्स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक हजार पेक्षा जास्त विविध सूक्ष्मजीवांचे प्रकार मानवी शरीरामध्ये असतात. प्रोबायोटिक्स सूक्ष्मजीव नैसर्गिक आणि मित्र वर्गीय सूक्ष्मजीव आहेत. जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांच्या पुरवठ्यासाठी दूध आणि दूध उत्पादन हे उत्तम स्त्रोत आहेत. विशेषतः हा किण्वन केलेले दुग्ध पदार्थ हा प्रोबायोटिक्स सूक्ष्म जीव साठी उत्तम स्त्रोत आहे. प्रोबायोटिक्स दुग्ध पदार्थातून घेणाऱ्यास दुग्धशर्कराची कमतरता, अतिसार, आतड्याचे आजार, कर्करोग यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. वय वाढत असताना रोगप्रतिकारक क्षमता कमी होते हे स्वाभाविक असून उतरत्या वयात प्रोबायोटिक्स चा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रोबायोटिक्स मधील विशिष्ट रोगप्रतिकारक शक्ती ला वाढविण्यास मदत करतात व इतर आजारांपासून सुद्धा बचाव होतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
probiotic food

 उपयुक्त सूक्ष्मजीव आणि काही दुग्ध उत्पादने

  • प्रोबायोटिक दूध : लॅक्टोबॅसिल्लस एसिडो फिलस, बिफिडोबॅक्टेरियम लॉन्गम इत्यादी
  • प्रोबायोटिक दही : लॅक्टोबॅसिल्लस केजी, लॅक्टोबॅसिलस एसीडोफीलस इत्यादी
  • योगर्ट: लॅक्टो बॅसिल्लस बल्गारी रीकस आणि  स्ट्रेप्टोकोकस थर्मो फीलस इत्यादी
  • प्रोबायोटिक श्रीखंड : लॅक्टोबॅसिल्लस केजी, लेक्टोबेसिलस एसीडोफीलस, लॅक्टोबॅसिल्लस बल्गारी रिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थरमोफिलस इत्यादी
  • प्रोबायोटिक कुल्फी : लॅक्टोबॅसिल्लस रमनसोस, केफिर लॅक्टोबॅसिल्लस हेल्वीटकस, लॅक्टोबॅसिल्लस कॅफरनोफाएसीन, लॅक्टोबॅसिल्लस एसीडोफीलस, लॅक्टोबॅसिल्लस बल्गारीरिकस इत्यादी

प्रोबायोटिक पदार्थांचे फायदे

  • दुग्धशर्करा याची कमतरता सुधारण्यासाठी उपयुक्त
  • अतिसार या पासून बचावासाठी उपयुक्त
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
  • पोटाचे, आतड्याचे आजार कमी करण्यासाठी
  • ताणतणाव, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

 इतर फायदे

 एलर्जी, मूत्रमार्गाचे व आतड्यांचे आजार इत्यादी बाबींवर प्रोबायोटिक्स उपयोगी ठरते. प्रोबायोटिक्स मुळे पौष्टिकता वाढते. मानसिक तणाव दूर होतो वयस्क व्यक्ती मध्ये  हाडांची झीज कमी होते.

 प्रोबायोटिक कुल्फी

 कुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार प्रसिद्ध आहे साधारणपणे कुल्फी  दूध आटवून त्यामध्ये साखर मिसळून तयार केली जाते. साधा सोबतच आहाराच्या दृष्टीने कुल्फी आरोग्यदायी आहे. कुल्फी मध्ये प्रोबायोटिक जिवाणूंचा वापर करून तिची पौष्टिकता वाढवता येते. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक  आणि मित्र वर्गीय सूक्ष्मजीव आहेत. जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यास मदत करतात.

 कुल्फी साठी आवश्यक घटक पदार्थ

 गाय किंवा  म्हशीचे दूध, मलाई, साखर, फळांचा रस, चॉकलेट, प्रोबायोटिक जीवाणू आणि रंग इत्यादी घटक कुल्फी बनवण्यासाठी आवश्यक असतात.

 पौष्टिक घटक :

 एकूण घन पदार्थ 36 टक्के

 फॅट 2.5 ते दहा टक्के

 प्रथिने 3.50 टक्के

 साखर 13 टक्के

 लॅक्‍टिक ऍसिड 0.20 टक्के

 प्रक्रिया कशी करावी?

  • गाय किंवा म्हशीचे दूध 90 अंश सेल्सिअस तापमानाला दहा मिनिटे गरम करावे.
  • दूध अर्धी आटेपर्यंत स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात घोटावे.
  • दुधाच्या 12 ते 15 टक्के साखर मिसळावी.
  • दूध कुल्फी साठी आवश्यक घनते पर्यंत घोटत राहावे.
  • आधीच  दुधामध्ये वाढवलेले प्रोबायोटिक जिवाणू कुल्फी मिक्स च्या 10% मिसळावे.
  • फळांचा रस, चॉकलेट आणि रंग मिसळावा  ( दोन टक्के )
  • तयार कुल्फी मिक्स स्टेनलेस स्टीलच्या साच्यामध्ये भरून उणे 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाला तीस मिनिटांसाठी ठेवावे.
  • तयार कुल्फी उणे 20 अंश  तापमानाला फ्रिजमध्ये ठेवावे.
English Summary: probiotic Published on: 25 June 2021, 05:10 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters